भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीसाठी (Virat Kohli) कालचा (18 ऑगस्ट) दिवस खूप खास होता. खरंतर, कोहलीनं (18 ऑगस्ट 2008) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. माजी भारतीय कर्णधारानं आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. मात्र, कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील रॅपिड फायर राउंडमध्ये कोहलीनं अनेक रंजक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
विराट कोहलीला (Virat Kohli) विचारण्यात आले की, आयपीएलमधील त्याचा आवडता विरोधी संघ कोणता आहे? मुंबई इंडियन्स की कोलकाता नाईट रायडर्स? यावर कोहलीनं मजेशीर उत्तर दिले. कोहली म्हणाला, “3 वेळचा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा माझा आवडता विरोधी संघ आहे. मला या संघाविरुद्ध खेळायला आवडते.” स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Celebrating 16 glorious years of Virat Kohli in international cricket!
Join us, as we ask @imVkohli about his favorite cricketer, TV show, singer, and 16 other exciting questions in a fun, rapid-fire round to celebrate #16YearsOfVirat! #KingKohli #16YearsOfVirat #ViratKohli pic.twitter.com/S8kJ0x61ws
— Star Sports (@StarSportsIndia) August 18, 2024
विराट कोहलीनं (Virat Kohli) 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यापूर्वी भारतीय अंडर-19 संघानं कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. विराट कोहली 2011चा एकदिवसीय विश्वचषक (One Day World Cup) जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय, तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) 2013 आणि 2024चा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 113 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी20 सामने खेळले आहेत. 113 कसोटी सामन्यात त्यानं 49.15च्या सरासरीनं 8,848 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 30 अर्धशतकं आणि 29 शतकं झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. 295 एकदिवसीय सामन्यात त्यानं 58.18च्या स्ट्राईक रेटनं 13,906 धावा केल्या, तर 72 अर्धशतकं आणि 50 शतकं झळकावली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे.
कोहली टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यानं 125 टी20 सामन्यात भारतासाठी 4,188 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 48.69 आणि स्ट्राईक रेट 137.04 राहिला. टी20 मध्ये त्यानं 38 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावले, तर या फारमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय
WTC टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी…पाकिस्तानची हालत खराब, जाणून घ्या सर्व 9 संघांची स्थिती