---Advertisement---

केवळ 29 धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास! आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच फलंदाज

On: बुधवार, मे 22, 2024 3:10 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 चा एलिमिनेटर आज (22 मे) खेळला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने असतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या दोन संघांची लढत होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहोचेल, जिथे त्यांची गाठ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. तर एलिमिनेटरमध्ये पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

विराट कोहलीनं त्याच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 7971 धावा केल्या आहेत. जर तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध 29 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो आयपीएलमध्ये 8000 धावांचा टप्पा पार करेल. अशाप्रकारे विराट कोहली आयपीएलमध्ये 8 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे.

आयपीएलच्या या हंगामात विराट कोहलीची बॅट आग ओकत आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 14 सामन्यांत 64.36 ची सरासरी आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटनं 708 धावा केल्या आहेत. या हंगामात कोहलीनं 59 चौकार आणि तब्बल 37 षटकार हाणले आहेत. तो ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अव्वल आहे. विशेष म्हणजे, त्याच्याशिवाय अन्य कोणताही फलंदाज 600 धावांचा आकडाही गाठण्यात यशस्वी झालेला नाही.

विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं आतापर्यंत 251 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं 38.69 ची सरासरी आणि 131.95 च्या स्ट्राईक रेटनं 7971 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावे आयपीएलमध्ये 8 शतकं आहेत. याशिवाय त्यानं 55 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. आयपीएलचे 17 हंगाम एकाच संघाकडून खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. मात्र अद्याप त्याला एकदाही विजेतेपद पटकावण्यात यश आलेलं नाही. आरसीबीची टीम 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम सामन्यात पोहचली होती. मात्र तिन्ही वेळा संघाचा पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! एलिमिनेटर सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका, आरसीबीनं रद्द केलं सराव सत्र

हैदराबादच्या एकतर्फी पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला, “आम्ही या पराभवाला…”

केकेआरची फायनलमध्ये धडक, पॅट कमिन्सच्या संघाचा दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---