---Advertisement---

‘रनमशीन’ कोहलीला एकाच दौऱ्यात १००० धावा करण्याची संधी

On: रविवार, फेब्रुवारी 18, 2018 5:09 PM
---Advertisement---

जोहान्सबर्ग। भारतीय संघाच्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. सध्या विराट त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याला भारताची रनमशीन का म्हणतात हे त्याने या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दाखवून दिले आहे. 

आजकाल विराट जेव्हाही मैदानात उतरतो तेव्हा काहीतरी विक्रम करत असतो. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतही विराटने जर १५६ धावा केल्या तर तो या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात १००० धावा पूर्ण करेल. तसेच एकाच दौऱ्यात १००० धावा पूर्ण करणारा तो दुसराच खेळाडू ठरेल.

याआधी हा विक्रम विंडीजचे महान क्रिकेटपटू सर विव रिचर्ड्स यांच्या नावावर होता. त्यांनी १९७६ मध्ये इंग्लंड दौऱ्यात १०४५ धावा केल्या होत्या. यात त्यांनी कसोटीमध्ये ८२९ धावा केल्या होत्या. तर वनडेमध्ये २१६ धावा केल्या होत्या.

विराटने या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३ कसोटी आणि ६ वनडे सामन्यात मिळून आत्तापर्यंत ८४४ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ कसोटीमध्ये १ शतक आणि १ अर्धशतकाच्या साहाय्याने २८६ धावा तर ६ वनडेत ३ शतके आणि १ अर्धशतकाच्या जोरावर ५५८ धावा केल्या आहेत. 

याबरोबरच विराटला आंतराष्ट्रीय टी २० मध्ये २००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अजून फक्त ४४ धावांची गरज आहे. जर त्याने या ४४ धावा केल्या तर तो आंतराष्ट्रीय टी २० मध्ये २००० धावा पूर्ण करणारा तिसराच खेळाडू ठरेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता पहिला टी २० सामना खेळवण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment