भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा केवळ त्याच्या मैदानातील कामगिरीमुळेच नाही तर मैदानाबाहेरील गोष्टींमुळेही बऱ्याचदा चर्चेत असतो. तो लोकप्रिय होण्यामागे केवळ त्याची कामगिरीच नाही तर त्याचे व्यक्तीमत्त्व देखील कारण आहे. नुकताच, विराट अशाच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा नवा लूक सध्या ट्रेंड होत असून त्यावर अनेक मीम्सही बनत आहेत.
विराटचा नवा लूक
विराट सध्या एका नव्या लूकमध्ये सर्वांना व्हायला मिळाला आहे. यात त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. एवढेच नाही तर त्याची दाढी देखील वाढलेली दिसत आहे. तसेच त्याने काळी फ्रेम असलेला चष्मा घातलेला दिसत आहे. त्याच्या या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया
विराटच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी विनोदी मीम्स तयार करुन शेअर केले आहेत. तर अनेकांनी त्याच्या या लूकची तुलना ‘मनी हाईस्ट’ या प्रसिद्ध मालिकेतील प्रोफेसरशी केली आहे. तर काहींनी त्याच्या या लूकची तुलना अभिनेता बॉबी देवोलशी देखील केली आहे.
https://twitter.com/Pratikshit6/status/1396747040273567747
Professor first look from Trophy Heist. Releasing June 18 pic.twitter.com/hDksy9pdrE
— Rishabh Srivastava (@AskRishabh) May 24, 2021
Professor First Look From
𝘛𝘳𝘰𝘱𝘩𝘺 𝘏𝘦𝘪𝘴𝘵, Releasing June 18.#viratkohli ❤ pic.twitter.com/wYq0rCZ5w3— 𝓐𝓷𝔀𝓮𝓼𝓱𝓪 𝓝𝓪𝓽𝓱 🥀 (@itz_anwi) May 24, 2021
Viart_Kohli New Look For World Test Championship👍🏻 Absolutely Osm👑❤@imVkohli #Worldtestchampionship 👌🏻 pic.twitter.com/Jsg6FLgINe
— Arbaz Hussain🇵🇰 (@ArbazHus77) May 24, 2021
The look you know || The inspiration you don't. #lordboby #ViratKohli pic.twitter.com/eaGRkw498f
— 𝖘𝖞𝖊𝖉 𝖘𝖚𝖍𝖆𝖎𝖑 (@Lambda__Velorum) May 24, 2021
Bobby Deol lite. pic.twitter.com/40U9jvQ9YA
— Dhoni❤️ (@iamvaishali6) May 24, 2021
भारताचा इंग्लंड दौरा
विराट आता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघासह इंग्लंज दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यात भारताला साउथँम्पटन येथे न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
विराटला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी
या इंग्लंड दौऱ्यात जेव्हा विराट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो भारताचे सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार ठरेल. विराटने सध्या आत्तापर्यंत भारताचे ६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यामुळे सध्या भारताकडून सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो आणि माजी कर्णधार एमएस धोनी संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. धोनीनेही ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. पण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ट चॅम्पियनशीप फायनल: पुजारा की टेलर कोण आहे सरस? पाहा ‘ही’ आकडेवारी
बुमराहचे चाहते थेट आयर्लंडमध्ये देखील! ‘ही’ महिला क्रिकेटपटू मानते आदर्श