कानपुर । विराट कोहली या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१०४ धावा केल्या आहेत. विराटने कानपुर वनडेत ११३ धावा केल्या. विराटला यावर्षी २००० धावा करण्यासाठी केवळ ९ धावा गरजेच्या होत्या.
विराटने यावर्षी ४० सामन्यात ४४ डावात फलंदाजी करताना ६०.११ च्या सरासरीने २१०४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.
२००० धावांमधील ४४९ धावा कसोटीमध्ये, १३५६ धावा वनडेत तर १९५ धावा टी२०मध्ये केल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या स्थानावर हाशिम अमला असून त्याने ३५ सामन्यात २०७३ धावा केल्या आहेत तर जो रूट ३० सामन्यात १८५५ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
विराटने २०१६ या वर्षातही २००० धावांचा टप्पा ओलांडला होता. तेव्हा त्याने ३७ सामन्यात २५९५ धावा केल्या होत्या. त्यात ७ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता.
विराटने यापूर्वी २०१४ आणि २०१६ यावर्षी २००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला आहे.
विराट कोहलीचा २०१७मध्ये मोठा पराक्रम
२१०४ विराट कोहली
२०७३ हाशिम अमला
१८५५ जो रूट