नागपुर | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत आज ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. त्यांचा हा निर्णय़ सध्यातरी बऱ्यापैकी यशस्वी ठरलेला दिसत आहे. २३.५ षटकांत भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे तंबूत परतले आहे तर अंबाती रायडूलाही विशेष चमक दाखवता आली नाही आणि तो १८ धावांवर बाद झाला. सध्या मैदानावर विराट कोहली ४९ तर विजय शंकर २१ धावांवर खेळत आहे.
कर्णधार म्हणून कोहलीचा विराट पराक्रम-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून जलद ९००० धावा करण्याचा टप्पा आज विराटने पार केला. त्याने १३३ सामन्यांत १५९ डावांत ६६.८५च्या सरासरीने ९०२८ धावा केल्या आहेत. यापुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान ९ हजार धावा करण्याचा विक्रम रिकी पाॅटिंच्या नावावर होता. त्याने २०३ डावांत ही कामगिरी केली होती.
विशेष म्हणजे कर्णधार असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ हजार, ५ हजार, ६ हजार, ७ हजार, ८ हजार आणि ९ हजार जलद धावा करण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे.
केवळ ६ खेळाडूंनी केली आहे अशी कामगिरी-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा कर्णधार असताना पार करण्याचा कारनामा केवळ ६ खेळाडूंनाच करता आला आहे. त्यात रिकी पाॅटिंग, ग्रॅमी स्मिथ, स्टिफन फ्लेमिंग, एमएस धोनी आणि अॅलन बाॅर्डर या महान कर्णधारांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१५४४०- रिकी पाॅटिंग
१४८७८- ग्रॅमी स्मिथ
११५६१- स्टिफन फ्लेमिंग
११२०७- एमएस धोनी
११०६२- अॅलन बाॅर्डर
९०३०- विराट कोहली#म #मराठी #ViratKohli #9000runs #IndvAus #Nagpur— Sharad Bodage (@SharadBodage) March 5, 2019
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असताना वेगवान ९ हजार धावा करणारे फलंदाज
१५९- विराट कोहली
२०३- रिकी पाॅटिंग
२०३- ग्रॅम स्मिथ
२२०- एमएस धोनी
२५७- अॅलन बाॅर्डर
२७१- स्टिफन फ्लेमिंग#म #मराठी #ViratKohli #9000runs #IndvAus #Nagpur pic.twitter.com/ZAhIrVrnUm— Sharad Bodage (@SharadBodage) March 5, 2019