आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. सर्व फ्रँचायंझीची तयारी सुरु झालेली आहे. त्याअगोदर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे. आयपीएल २०११ च्या लिलावापूर्वी आरसीबीने फक्त विराट कोहलीलाच संघात कायम ठेवले आणि अनेक बड्या खेळाडूंना संघातून काढले. २०११ मध्ये चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा पर्याय होता. तरीसुद्धा फ्रँचायझीने कोहलीसोबत अट ठेवली आणि ती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.
आरसीबीने पहिल्या तीन हंगामात दोन वेळा नॉक आउट फेरी गाठली होती. यापैकी २००९ मध्ये अंतिम फेरीपर्यंत संघाने प्रवास केलेला. पहिल्या काही आयपीएल हंगामात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल आरसीबी पॉडकास्टवर बोलताना कोहली म्हणाला, “मला ते खूप आवडले, माझी हरकत नव्हती. मला आठवते की आम्ही दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स लीग खेळत होतो आणि रे जेनिंग्स आणि सिद्धार्थ मल्ल्या माझ्याकडे आले. ते म्हणाले की त्यांना फक्त मला संघात कायम ठेवायचे आहे आणि त्यांना माझ्यासोबत एक संपूर्ण नवीन संघ तयार करायचा आहे.”
पूढे विराट म्हणाला की, “मी म्हणालो की हे छान आहे आणि मी शोधत असलेली संधी हीच आहे. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, माझी फक्त एकच अट आहे. मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेन बाकी कुठेही नाही. ते सहमत असल्याचे मला दिसले. संघासाठी मी काहीतरी खास करू शकतो हे मला माहीत होते. ही जबाबदारी स्वीकारण्यात मला कसलीच अडचण आली नाही.”
भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळू न शकल्याच्या निराशेवर बोलताना कोहली म्हणाला, आयपीएलमधील पहिली तीन वर्षे मी काहीतरी खास करू शकेन, असा विश्वास वाटत होता. मला असे वाटले की संघाची रचना ध्यानात घेऊन मी त्या क्रमांकावर खेळू शकत नव्हतो जी माझी ताकद होती. पहिल्या तीन वर्षांत माझ्या प्रदर्शनात सातत्य राहिले नाही. मी भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळत होतो पण मला आयपीएलमध्ये आरसीबीसाठी असे करता आले नाही. माझ्यासाठी ही विचित्र स्थिती होती कारण मला वाटले की, मी माझ्या भारतासाठीच्या कामगिरीची येथे पुनरावृत्ती करू शकेन.”
महत्वाच्या बातम्या–
“…आणि तेव्हापासून आम्ही मित्र बनलो”; विराटसोबतच्या मैत्रीवर व्यक्त झाला एबी (mahasports.in)
विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती (mahasports.in)