विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. या खेळाला जगभर ओळख मिळवून देण्यात त्याचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे.
आता पहिल्यांदाच अमेरिकेत टी20 विश्वचषक होणार आहे, त्याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. परंतु अमेरिकेत विश्वचषक आयोजित करण्याचा प्रयोग यशस्वी होईल का?, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत. आता या विषयावर स्वतः विराट कोहलीनं एक मोठं विधान केलं. “अमेरिकेत कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळलं जाऊ शकते असं मला कधीच वाटलं नव्हतं”, असं कोहली म्हणाला.
विराट कोहली अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकाबद्दल बोलताना म्हणाला, “अमेरिकेत कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळलं जाऊ शकेल असं कधीच वाटलं नव्हतं. मात्र आता हे वास्तव बनलं असून, यावरून जगात क्रिकेटचं महत्त्व वाढत असल्याचं दिसून येतं. अमेरिकेत कदाचित असे बरेच लोक असतील ज्यांनी हा खेळ स्वीकारला आहे. विश्वचषकाचं आयोजन करून जागतिक स्तरावर क्रिकेटला चालना देणारा हा पहिला देश बनणार आहे.”
विराट कोहली पुढे बोलताना म्हणाला की, “विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटला चालना देणं ही सर्वोत्तम सुरुवात म्हणता येईल. मला आशा आहे की अमेरिकेत क्रिकेटचा असाच प्रचार होत राहील. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे या खेळाला अमेरिकेत पुढे नेण्यास उत्सुक आहेत. यामुळे इतर देशांतही क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची क्रेझ वाढू शकेल. येथे या आधीच फ्रेंचायझी क्रिकेटला सुरुवात झालीय. आता खेळ योग्य दिशेनं वाटचाल करत आहे.”
Virat Kohli talking about the rise of cricket in the USA. pic.twitter.com/R47C4X95a0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 31, 2024
2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल. भारतीय संघ आपला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. अंतिम सामना 29 जून रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिलांच्या निधनानंतर घेतला क्रिकेटमधून ब्रेक! टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचा मोठा निर्णय
युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व