---Advertisement---

वडिलांच्या निधनानंतर घेतला क्रिकेटमधून ब्रेक! टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचा मोठा निर्णय

On: शनिवार, जून 1, 2024 4:24 PM
---Advertisement---

येत्या 2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यासाठी सर्व खेळाडू आणि संघ जोमानं तयारी करत आहेत. मात्र इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स यानं स्वत:ला या स्पर्धेपासून दूर ठेवलं आहे. त्यानं क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. ख्रिस वोक्सनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून यामागचं कारण सांगितलं, ज्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांना वोक्सला लवकर मैदानावर खेळताना पाहायचं आहे.

इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स यानं सोशल मीडियावर त्याचा क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय स्पष्ट केला. वोक्सनं लिहिलं, “गेला महिना माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक महिना होता. दुर्दैवानं, मे महिन्याच्या सुरुवातीला माझ्या वडिलांचं निधन झालं. आम्ही सर्व नक्कीच दुःखी आहोत आणि निश्चितच हा आमच्या जीवनातील सर्वात कठीण क्षण आहे. आम्ही त्यातून जाण्याचा प्रयत्न करत आहोत.” वोक्सनं या कठीण काळात कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर भर दिलाय.

35 वर्षीय ख्रिस वोक्स या वर्षी देशांतर्गत क्रिकेट किंवा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही खेळला नाही. तसेच त्याचा इंग्लंडच्या टी20 विश्वचषक संघातही समावेश करण्यात आलेला नाही. ख्रिस वोक्सनं कबूल केलं की, त्याच्या वडिलांना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा खूप अभिमान होता. माझ्यासाठी कुटुंब प्रथम येतं, असं त्यानी स्पष्ट केलंय. वोक्स म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर मी वारविकशायरसाठी पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात करेन. या खेळावर माझ्या वडिलांचं खूप प्रेम होतं.”

ख्रिस वोक्सनं इंग्लंडसाठी 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 48 कसोटी सामने, 122 एकदिवसीय सामने आणि 33 टी20 सामन्यांचा समावेश आहे. वोक्स 2022 च्या टी20 विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा भाग होता. तसेच तो 2019 एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा देखील सदस्य होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व

शुबमन गिल त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या टीव्ही अभिनेत्रीशी लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बलात्काराचे आरोप, पंचांशी बाचाबाची अन् नो बॉल वाद! टी20 विश्वचषकात घडलेल्या सर्वात मोठ्या वादग्रस्त घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---