साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात विराटने जर 104 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार करेल.
विराटच्या सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 374 सामन्यातील 415 डावात 56.36 च्या सरासरीने 19896 धावा आहेत. यामध्ये त्याच्या वनडेमधील 11020 धावा, कसोटीमधील 6613 धावा आणि टी20 मधील 2263 धावांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा जगातील 11 खेळाडूंना पार करता आला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यामुळे विराटने जर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार केला तर तो असे करणारा तिसराच भारतीय ठरेल.
याचबरोबर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावा पूर्ण करणाराही फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराच्या नावावर आहे.
सचिन आणि लारा या दोघांनीही 453 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटला आज 416 व्या डावातच हा टप्पा गाठण्याची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
34357 धावा – सचिन तेंडुलकर
24208 धावा – राहुल द्रविड
19896 धावा – विराट कोहली
18575 धावा – सौरव गांगुली
17253 धावा – विरेंद्र सेहवाग
17055 धावा – एमएस धोनी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–संगकाराने व्यक्त केला मोठा विश्वास, हा भारतीय खेळाडू मोडू शकतो त्याचा खास विश्वविक्रम
–डेव्हिड वॉर्नर त्या खेळाडूला म्हणाला, ‘बिग मॅन, आय ऍम सॉरी’
–आयसीसीने सौम्य सरकारची केली ख्रिस्तियानो रोनाल्डोशी तुलना, चाहत्यांनी असे केले ट्रोल