मुंबई । काल बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे दिवाळीसाठी शूट केलेल्या एका खास ‘कॅन्डीड चाट’ शो साठी एकत्र आले होते. या कार्यक्रमात विराट कोहलीने अनुष्का बरोबरच्या नात्याचा खुलासा केला.
आमिर खान सध्या त्याच्या सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाच्या चित्रीकरणात सिंगापूरला व्यस्त आहे परंतु या कार्यक्रमाच्या खास शूटसाठी तो मुंबईला आला होता. पत्रकार समीर अल्लानाच्या म्हणण्यानुसार विराटअनुष्का शर्मा आणि त्याच्या खास नात्याविषयी मनमोकळेपणाने बोलला. समीर अल्लाना हे शूटच्या वेळी तिथे उपस्थित होते.
प्रश्नोत्तरे सुरु असताना आमिर खानने विराटला अनुष्काच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही असा प्रश्न केला. त्यावर अनुष्का प्रामाणिक आणि काळजी घेणारी आहे तसेच एक व्यक्ती म्हणून तिने विराटला चांगलं बनण्यासाठी गेली ३-४ वर्ष खूप मदत केल्याचे तो म्हणाला. परंतु ती कायम उशिरा येते तसेच ५-६ मिनिट उशीर हे नित्याची बाबअसल्याचंही विराट पुढे म्हणाला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली टी२० ७ ऑक्टोबर रोजी रांची येथे होणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे मालिकेत विजय मिळवला आहे.