मुंबई । दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 21 जून रोजी हा दिवस साजरा केला. ‘फादर्स डे’ चे औचित्य साधून अनेक जण आपल्या वडिलांचे फोटो शेअर करत होते. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील ‘फादर्स डे’ निमित्त वडिलांचा भावूक करणारा एक फोटो शेअर केला.
विराट कोहलीने कॅप्शनमध्ये लिहले की, “फादर्स डेच्या निमित्ताने, तुम्ही सर्वांनी आपल्या वडिलांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ असले पाहिजे आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्या योग्य मार्गाच्या शोधत राहा, अशी मी विनंती करतो. तुम्हाला कधीच पाठीमागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही कारण वडील सतत तुम्हाला पाहत असतात. जरी ते या जगात असतील अथवा नसतील. फादर्स डे च्या शुभेच्छा!”
This father's day, I urge you all to be grateful for the love of your father but always look for your own path to move forward in life. You'll never have to look behind because they're always watching over you whether they're physically there or not. Happy father's day 😊💛 pic.twitter.com/u87hHWL03b
— Virat Kohli (@imVkohli) June 21, 2020
भारतीय कर्णधार जेव्हा 18 वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. 19 डिसेंबर 2006 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात खेळत होता. त्या दिवसाचा खेळ थांबला होता तेव्हा तो 40 धावांवर नाबाद होता.
रात्री दोन वाजता त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळाली तेव्हा नेमके काय करावे हे त्याला समजत नव्हते. अशा कठीण प्रसंगी त्याने क्रिकेट खेळणे सुरू ठेवले आणि त्या सामन्यात 90 धावांची शानदार खेळी करत आपल्या संघाला फॉलोऑनपासून वाचविले. त्यानंतर लगेच तो त्याच्या घरी गेला आणि वडिलांच्या अंत्यसंस्काराला हजर राहिला.
ट्रेंडिंग घडामोडी –
६०० विकेट्स घेणाऱ्या ‘या’ क्रिकेटपटूला एका गुंडाने जेलमधून लिहिले होते अभिनंदनाचे पत्र
भारत म्हणजे मॅच फिक्सिंगचा अड्डा, पहा कुणी केली ही विषारी टीका
भारताकडून एकेवेळी जबरदस्त गोलंदाजी केलेला खेळाडू म्हणतो, माझाही सुशांत सिंग रजपूत केला होता