---Advertisement---

वनडे खेळतो म्हणून एका दिग्गजाची विराटवर टीका! दुसऱ्याने केली पाठराखण; म्हणाले, “विचार बदला”

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 6:05 PM
---Advertisement---

भारताचे अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका पाठोपाठ कसोटी आणि टी२० मधून निवृत्ती घेतली. यामुळे आता हे दोघे केवळ वनडेमध्ये खेळताना दिसतात. यामुळे या दोघांच्या कोणत्याही स्पर्धांमधील सामन्यांना चाहते गर्दी करत आहेत. त्याचा एक फायदा असा झाला की मागे असलेल्या वनडे क्रिकेटला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. काहींच्या मते कसोटी आणि टी२० प्रकाराच्या तुलनेने वनडे क्रिकेट जरा मागे राहिलेला दिसून येत आहे. वनडे क्रिकेट सोपे आहे म्हणून विराट खेळतो, असे विधान दिग्गजाने केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने विराट वनडे का खेळतो तर तो क्रिकेटमधील सर्वात सोपा प्रकार आहे, असे विधान करत नव्या वादाला सुरूवात केली आहे. त्याच्या या विधानावर भारताच माजी फिरकीपटू हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केली आहे.

मांजरेकरने इंस्टाग्रामच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले, “विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती तर बरे झाले असते. पण त्याने वनडे क्रिकेट खेळण्याचे ठरवले. यामुळे मी निराश झालो, कारण माझ्या मते एका उत्कृष्ठ क्रिकटपटूसाठी वनडे हा सर्वात सोपा प्रकार आहे. त्यामानाने कसोटी आणि टी२० कठीण आहे.”

“भारतीय क्रिकेटमध्ये मागील वर्षापासून फलंदाजांची क्रमवारी पाहिली तर जे वनडेमध्ये सलामीला येतात ते कसोटीमध्ये मधल्या फळीत खेळतात. दुसरीकडे वनडेमध्ये पाहिले तर काही खेलाडू पहिल्या तीनमध्ये फलंदाजी करण्यास आतुर असतात. कारण वनडेमध्ये क्षेत्ररक्षण कसोटीपेक्षा वेगळे असते आणि फलंदाजाचा केवळ १०-१५ धाव घेण्यावर भर असतो”, असेही ते पुढे म्हणाले.

मांजरेकरच्या या विधानांना हरभजनने उत्तर दिले. तो म्हणाला, “जर एखाद्या प्रकारात धावा करणे सोपे आहे तर ते कुणीही करेल. विराट चांगलाच फॉर्ममध्ये असून त्याच्या फलंदाजीचा आनंद घ्या. तो संघासाठी धावा करत आहेत, सामना जिंकत आहे मग तो कोणताही प्रकार खेळू दे. विराट भारताचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. मांजरेकर यांचे ते स्वत:चे विचार आहेत. “

विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत ९३ धावांची खेळी केली होती. ज्यामुळे तो आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या स्थानी आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---