भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब पट्ट्यावर आहे. मागच्या अडीच वर्षांपासून विराट अपेक्षित प्रदर्शन करत नसल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही विराट अपयशी ठरला. अशात त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा विराटच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना एजबस्टनमध्ये खेळला गेला. उभय संघातील हा सामना इंग्लंडने ७ विकेट्स राखून जिंकला आणि कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीवर सोडवली. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्याच्या पहिल्या डावात ११, तर दुसऱ्या डावात २० धावा करून बाद झाला. विराटला फॉर्ममध्ये पुनरागमन करण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोठी विश्रांती हा एकमेव पर्याय सुचवला आहे, परंतु त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांच्या मते विराटला कसल्याही विश्रांतीची गरज नाहीये.






