जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ तयार दिसत आहेत. 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत रोमांचक ठरण्याची अपेक्षा सर्वांनाच आहे. कर्णधाराच्या रूपात रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तत्पूर्वी, एका मुलाखतीत भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली याने त्याचे कौतुक केले आहे.
विराट व रोहित हे मैदानावर तसेच मैदानाबाहेर चांगले मित्र मानले जातात. ते नेहमीच एकमेकांबद्दल आदरपूर्वक बोलताना दिसतात. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विराट रोहितबद्दल म्हणाला,
“जेव्हा मी रोहित शर्माला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिलं, तेव्हा मला समजलं की, त्याच्या भोवती इतके वलय का आहे आहे आणि त्याला इतके उच्च दर्जाचे का समजले जाते. त्याच्याकडे इतर फलंदाजांपेक्षा थोडा अधिक वेळ असतो. हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते.”
रोहितच्या फलंदाजीविषयी बोलताना तो म्हणाला,
“मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने काय केले आहे हे आपण सर्वजण जाणतो. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये नेहमी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तो आतुर असतो. सलामीला फलंदाजी करणे कधीही सोपे नसते. मात्र, त्याने हे अवघड काम नेहमीच उत्तमरीत्या करून दाखवले आहे.”
रोहित हा 2007 पासून भारतीय संघासाठी खेळतोय. वनडे व टी20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी त्याने केली असून, कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने आपला दर्जा दाखवून दिला आहे. रोहित प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. हा सामना जिंकून भारतासाठी कपिल देव व एमएस धोनी यांच्यानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तिसरा कर्णधार होण्याचा मान त्याला मिळू शकतो.
(Virat Kohli Praised Rohit Sharma On ICC Interview Ahead WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: इंग्लंडच्या अष्टपैलूचा निवृत्तीवरून ‘यू टर्न’, दोन वर्षांनी ऍशेसमध्ये करणार कमबॅक
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…