आयपीएलमध्ये काल(3 ऑक्टोबर) झालेल्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची नाबाद खेळी करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. मात्र सामन्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्वाचे नवे रूप पाहायला मिळाले. त्याने राजस्थानचा अष्टपैलू राहुल तेवतियाला स्वतःचे नाव असलेली आरसीबी संघाची जर्सी भेट दिली. या जर्सीवर त्याने सही केली होती.
तेवतियाला झाला आनंद
कोहलीने दिलेल्या या खास भेटवस्तूमुळे तेवतियाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कोहलीही जर्सी देताना आनंदित दिसत होता. कोहली तेवतियाला जर्सी देतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
A special autographed jersey from Virat Kohli to Rahul Tewatia 🖋️
Game recognises game 🏏 #IPL2020 pic.twitter.com/t9O5XlhCuj
— ICC (@ICC) October 3, 2020
कोहलीने केली शानदार खेळी
आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट आतापर्यंत शांत होती आणि आणि त्याने काही खास कामगिरी केली नव्हती. मात्र राजस्थान विरुद्ध नाबाद 72 धावांची खेळी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे ही आरसीबीसाठी चांगली बाब आहे. आगामी सामन्यांमध्येही विराट कोहली अशीच कामगिरी करेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.
एकतर्फी मिळवला विजय
कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने राजस्थानचा एकतर्फी पराभव केला. आरसीबीने राजस्थानला आठ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे आरसीबीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. विराट कोहली आपला फॉर्म टिकवून ठेवू शकेल का हे पाहावं लागेल.