---Advertisement---

ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला

---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२९ सप्टेंबर) हंगामातील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली चांगल्या लयीत दिसत होता. विराटने २० चेंडूत २५ धावा केल्या होत्या. पण दुर्दैवाने तो धावबाद झाला. एक वेळ अशी होती की, तो या सामन्यात मोठी खेळी करेल असे वाटत होत. पण अशातच श्रीकर आणि विराटमध्ये एक धाव घेताना ताळमेळ बिघडला आणि राजस्थानच्या रियान परागने केलेल्या डायरेक्ट हिटवर तो बाद झाला.

असे असले तरीही, सामना संपल्यानंतर विराटने रियान परागला एक खास भेट दिली आहे. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सामन्यात आरसीबीने विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराटने रियानला त्याची स्वाक्षरी केलेली एक बॅट भेट दिली आहे. सामना संपल्यानंतर या दोघांमध्ये क्रिकेटविषयी काही वेळ चर्चाही झाली आणि यादरम्यान विराटने त्याला भविष्यासाठी मोलाचे सल्लेही दिले आहेत.

https://twitter.com/man4_cricket/status/1443281259115868160?s=20

आरसीबीसाठी राजस्थानविरुद्धच्या सामन्यातील विजय खूप महत्वाचा ठरला आहे. कारण या विजयानंतर त्यांचा स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठीचा रस्ता सोपा झाला आहे. तर दुसरीकडे राजस्थान राॅयल्सचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे.

सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानने पहिल्या ११ षटकांत १०० धावा केल्या होत्या आणि संघ १७०-१८० धावा करेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, शवटच्या ९ षटकांमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि केवळ ४९ धावा दिल्या, तसेच ८ विकेट्सही मिळवल्या. राजस्थान संघ २० षटकात १४९ धावा करू शकला. प्रत्युत्तरात आरसीबीने केवळ ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि अवघ्या १७.१ षटकांमध्ये १५३ धावा केल्या आणि सामन्यात विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO: ‘बूम बूम’ची युएईतून थेट युरोपात उडी…! खास गोलंदाजी ऍक्शनने वेधतोय सोशल मीडियाचं लक्ष

‘टी२० विश्वचषकासाठी आम्ही आमचे सर्वस्व झोकून देऊ, यंदा चषक आपलाच’, रोहितचा चाहत्यांना शब्द

बेंगलोरने राजस्थानवर विजय मिळवत मुंबईची केली मदत, प्लेऑफची समीकरणे झाली रंजक; पाहा गुणतालिका 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---