केप टाऊन : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौर्यावर आहे. या दौर्यातील अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना केप टाऊन इथे होणार आहे. ११ जानेवारी (मंगळवार) पासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषद घेत आहे. (Virat Kohli Press Conference)
• मी पूर्णतः तंदरुत – विराट
पत्रकार परिषदेत बोलताना विराटने सुरूवातीलाच, ‘मी पूर्णतः फीट असून मैदानावर खेळण्यास सक्षम आहे’ असे सांगितले.
• ‘नंबर पाहून अंदाज लावणे योग्य नाही’
‘देशासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमीच गौरवास्पद आहे. पण काहीवेळा परिस्थिती तुम्हाला अनुकूल नसते. मागील एक वर्षात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा परिणाम माझ्या परफॉर्मन्सवर झाला. परंतू, काहीवेळा नंबर पाहून अंदाज लावणे योग्य नसते’ – विराट कोहली
• ‘मागील चार-पाच वर्षातील यश हे सांघिक कामगिरीचा परिणाम’ – विराट कोहली
संघाच्या कामगिरीवर समाधानकारक असल्याचे विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बोलताना, ‘कुठल्याही परिस्थितीत विजयासाठी आवश्यक एकाग्रता आणि इर्षा याचा फायदा मागील चार-पाच वर्षात झाला. आणि हे संपूर्ण संघाच्या सांघिक कामगिरीमुळे शक्य झाले.’
• पुजारा – रहाणेच्या प्रश्नावर कोहलीचे उत्तर
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरी आणि फार्मबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होत आहे. केप टाऊन कसोटीच्या अनुषंगाने याबद्दल विराटला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, त्याने यावर स्पष्ट उत्तर दिले.
‘रहाणे आणि पुजारा यांच्या अनुभवाचे मोल करता येणार नाही. ते अतिशय खडतर परिस्थितीत समोर आले आहेत. त्यांच्ता अनुभवाचे प्रदर्शन आपण मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या कसोटीत पाहिले आहे.’ असे विराट म्हणाला. तसेच सदर खेळाडूंच्या संक्रमणाच्या प्रश्नावर, ‘कुणावरही बदल थोपावता येणार नाही. ही वैयक्तिक आणि परिस्थितीनुसार होणारी गोष्ट असेल.’ असे विराटने म्हटले.
• सिराजच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह
पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहलीने मोहम्मद सिराजबाबत महत्वाची माहिती दिली. ‘सिराज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी अद्याप पूर्णतः तयार नाही’ असे विराट कोहलीने म्हटले आहे.
• धोनीच्या मार्गदर्शनपर शब्दांची विराटने काढली आठवण
विराटने पत्रकार परिषदेत बोलताना महेंद्रसिंग धोनीने करिअरच्या सुरूवातीच्या काळात केलेल्या मार्गदर्शनाची आठवण सांगितली. ‘एमएस धोनीने मला एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे एकच चुक पुन्हा होणार असेल तर त्यात किमान ७-९ महिन्यांचे तरी अंतर असावे. तरच तुमचे करिअर दीर्घकालीन होऊ शकेल. त्याचे ते बोल मी कायमच लक्षात ठेवलेत.’
• कसोटीत खेळू न शकल्यास वाईट वाटतं – विराट
जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा दारूण पराभव झाला. विराट कोहली त्या कसोटीत प्रकृती कारणास्तव टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. याबद्दल बोलताना विराटने, ‘जेव्हा तुम्ही टेस्ट मिस करता तेव्हा खुप वाईट वाटत असते आणि अपराधीपणाची भावना येते. तसेच, तुम्ही हाच विचार करता की, मला दुखापत झालीच कशी’, असे म्हटले.
• पंतच्या प्रश्नांवर विराट कोहलीचे एका वाक्यात उत्तर
जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा दारूण पराभव झाला. याची कारणीमिमांसा करताना अनेकांनी रिषभ पंतला जबाबदार धरले. त्यातीही त्याच्या चुकीच्या फटकेबाजीवर आणि बेफिकीर वागण्यावर बोट ठेवले. याच मुद्द्यावर बोलताना विराटने स्वतःचे मत मांडले. ‘आपल्या संपूर्ण करिअरमध्ये आपण सर्वजण कधीतरी चुका करत असतोच.’ असे विराटने म्हटले.
टीप – ही बातमी लाईव्ह असून सतत अपडेट होत आहे. अधिक माहितीसाठी बातमी रिफ्रेश करत राहा