मागील 10 वर्षात वनडे (ODI) आणि कसोटी (Test) क्रिकेटमध्ये उत्कृष्ट (Best Performance In A Decade) कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची यादी विस्डेनने (Wisden) जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) या दशकातील सर्वोत्तम संघांमध्ये स्थान दिले आहे.
विराट कोहलीला कसोटी आणि वनडे अशा दोन्हीही संघात समाविष्ट केले आहे. तसेच, एमएस धोनी आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) फक्त वनडे संघात सामील केले आहे. त्याचबरोबर, कसोटी संघात भारताचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनचाही (R Ashwin) समावेश करण्यात आला आहे.
या संघाला लाॅरेेंस बूथ, जो हर्मन, जो स्टर्न, फिल वाॅकर आणि यश राणा यांनी निवडले आहे.
या दोन्हीही (कसोटी आणि वनडे) संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही.तसेच कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा एकही खेळाडूला स्थान मिळाले नाही. परंतु, न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा (Trent Boult) वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) हा एकमेव खेळाडू आहे, जो वनडे संघात सामील झाला आहे.
ऍलिस्टर कूक (इंग्लंड), डेव्हिड वाॅर्नर (ऑस्ट्रेलिया), कुमार संगकारा (श्रीलंका), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), बेन स्टोक्स (इंग्लंड), एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका), आर अश्विन (भारत), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), जेम्स अँडरसन (इंग्लंड).
विस्डेनचा दशकातील सर्वोत्तम वनडे संघ-
रोहित शर्मा (भारत), डेव्हिड वाॅर्नर (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), एबी डिविलियर्स (दक्षिण अफ्रीका), जाॅस बटलर (इंग्लंड), शाकिब अल हसन (बांग्लादेश), एमएस धोनी (भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
कसोटी क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, मात्र रहाणेची झाली घसरण
वाचा- 👉https://t.co/I4U05fqpzS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT @BeyondMarathi #viratkholi— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019
श्रीलंकाविरुद्ध टी२० मालिकेआधी शिखर धवन खेळणार या संघाकडून
वाचा- 👉https://t.co/uSScH0XQYs👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT @BeyondMarathi #ShikharDhawan— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019