भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात जरी निराशाजन पराभवाचा सामना करावा लागला असला तरी विराट कोहलीच्या एकदिवसीय सामन्यातील क्रमवारीवर याचा काहीही फरक पडला नाही.
आज आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार विराट कोहली ८६५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून भारतीय सलामीवीर शिखर धवन १०व्या तर रोहित शर्मा ११व्या स्थानावर आहे.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा पहिल्या २० खेळाडूच्या स्थान टिकवून असून तो सध्या १५ व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फलंदाज आझम बाबरला तीन स्थानांचा फायदा होऊनतो आता ५व्या स्थानी आला आहे. फलंदाजीमध्ये पहिल्या २०खेळाडूंमध्ये बाबर आणि हाफीज हे दोनच खेळाडू असून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीचा त्यांना क्रमवारीत फायदा झाला.
गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू नसून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समावेश नसलेलं अक्सर पटेल १६व्या आणि अमित मिश्रा १८व्या क्रमांकावर आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अचूक गोलंदाजी करणार भुवनेश्वर कुमार १९व्या स्थानी आहे.
पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केलेल्या जबदस्त कामगिरीमुळे हा संघ ८व्या क्रमांकावरून ६व्या क्रमांकावर आला आहे.
१६ जून रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत भारतीय संघ ११८ गुणांसह २ऱ्या स्थानी होता परंतु पाकिस्तानबरोबर अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतचे दोन गन कमी होऊन भारत आता ११६ गुणांसह भारत आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे.
– Pakistan climb to SIXTH spot in the @ICC ODI teams' ranking
1. SA
2. Aus
3. Ind
4. Eng
5. NZ
6. Pak
7. Ban
8. SL
9. WI
10. Afg— Asif Khan (@mak_asif) June 18, 2017