सिडनी कसोटी सामना वाचवण्यासाठी भारतीय संघाकडे फारशा धावा नाहीत. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करत नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहली भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.
आज कोहलीचं नेतृत्व अव्वल दर्जाचं दिसून आलं. त्यानं ऑस्ट्रेलियन चाहत्यांना छेडलं. कोहलीनं त्यांना सँडपेपरच्या घटनेची आठवण करून दिली, जी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात केली होती. त्यानं सकाळपासून भारतीय समर्थकांचा उत्साह वाढवण्याचं आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना चिडवण्याचं काम केलं.
स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यानंतर 11व्या षटकादरम्यान कोहलीनं प्रेक्षकांशी जुगलबंदी केली. त्यानं त्याचे पॉकेट रिकामे करून दाखवले की त्यात सँडपेपर नाही. आम्ही अशा गोष्टी करत नाही, हे कोहलीला याद्वारे सांगायचं होतं. सँडपेपरची घटना ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट घटनेंपैकी एक आहे. विराटनं आज पुन्हा तिची आठवण करून दिली. विराटच्या या हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
KING KOHLI ON FIRE..!!!! 🔥
– Virat Kohli Replicating the Sandpaper Gate incident at SCG and showing the Pockets to Australian crowds. 😀pic.twitter.com/C3qfxqOpyH
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 5, 2025
ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनी 2018 मध्ये केपटाऊनमध्ये चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर केला होता. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरवर प्रत्येकी एक वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तो मुद्दा आता अनेकदा समोर येतो आणि लोक स्मिथला ‘चीटर चीटर’ म्हणून हिणवतात.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. रोहित शर्माला खराब फॉर्ममुळे या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी नेतृत्व करत असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. त्यामुळे सध्या कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं आहे.
हेही वाचा –
IND vs AUS; “रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाला हादरून सोडले” महान खेळाडूने केले कौतुक
भारतीय खेळाडूंनी सॅम कोन्स्टासला धमकावले, प्रशिक्षकाने केला मोठा आरोप
IND vs AUS; रोहित शर्माच्या वक्तव्यावर इरफान पठाणची प्रतिक्रिया व्हायरल