---Advertisement---

दिग्गज क्रिकेटर विराट कोहली कसोटीतून निवृत्त…!

On: सोमवार, मे 12, 2025 12:12 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने आज (12 मे) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Virat Kohli Retired Form Test Cricket) अलिकडेच रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता विराटनेही अचानक कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.

विराटने गेल्या वर्षीच भारताने टी20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो कसोटीतूही निवृत्त झाला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विराटचा फिटनेस पाहता तो टीम इंडियासाठी आणखी 3-4 वर्ष खेळू शकला असता.

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत राहिली होती. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वारंवार एकाच पद्धतीने बाद झाल्याने तो बराच निराश झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो विकेटच्या मागे बाद होत होता. मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले असेल, परंतु त्यानंतर त्याची कामगिरी खूपच खराब होती. या मालिकेत भारताला 1-3 असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी, जेव्हा न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच भूमीवर 3-0 असा व्हाईटवॉश दिला होता, तेव्हाही कोहलीची बॅट शांतच होती. तो 3 सामन्यांमध्ये एकत्रितपणे 100 धावा करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून 15.50च्या सरासरीने फक्त 93 धावा आल्या. या दोन्ही मालिकांमुळे कदाचित विराट कोहलीला हा निर्णय घ्यावा लागला असेल.

2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) 2019 पर्यंत कसोटी क्रिकेटवर राज्य केले. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी (54.97) जवळपास 55 होती. यादरम्यान त्याने 27 शतके झळकावली होती. तो फॅब-4 मध्ये जो रूट, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथपेक्षा जास्त शतके ठोकणारा खेळाडू होता. पण 2020 सुरू होताच, त्याच्या कामगिरीत सतत घसरण दिसून आली. (1 जानेवारी 2020) पासून विराटच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, त्याने 39 सामन्यांमध्ये 30.72च्या सरासरीने फक्त 2,028 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, या काळात त्याच्या बॅटमधून फक्त 3 शतके आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---