भारतात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या सावटाखाली भारतातील वेगवेगळ्या शहरात आयपीएल २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागील दोन दिवसात क्रिकेटपटू आणि इतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आयपीएलचा चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यानंतर भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटू घरी परतण्याच्या मार्गावर आहेत.
यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघनायक विराट कोहली याचा समावेश असून तो बुधवारी (०५ मे) मुंबईत आपल्या घरी परतला आहे. विशेष बाब अशी की, आता लवकरच तो अनुष्का शर्मासोबत मिळून कोविड समर्थन चळवळीस सुरुवात करणार आहे.
कोरोना व्हायरसने आयपीएल २०२१ चा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गेल्या २ दिवसात काही संघांचे काही खेळाडू आणि सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अखेर मंगळवारी बीसीसीआयने हा हंगाम २९ सामने पूर्ण झाल्यानंतर स्थगित केला.
हा निर्णय जाहीर करताना आयपीएलच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले गेले की ‘बीसीसीआय खेळाडूंच्या, सपोर्ट स्टाफच्या आणि आयपीएल आयोजनात सहभागी असलेल्या कोणाच्याही सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही.’
बीसीसीआयच्या या निर्णयानंतर क्रिकेटपटू घरी परतताना आहेत. अशात विराटही मुंबईला त्याच्या राहत्या घरी पोहोचला आहे. सोशल मीडियावर त्याचे मुंबई विमानतळाबाहेर येतानाचे फोटो वेगाने व्हायरल होत आहे. विराटने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि पॅन्ट घातलेले दिसत आहे. सोबतच त्याने मास्क घातला असून हातातही ग्लोव्ह्ज घातले आहेत.
https://www.instagram.com/p/COexcnoNs5_/?igshid=5grq67btssbj
https://www.instagram.com/p/COegDT6LW6s/?igshid=j2h76xvpljoo
https://www.instagram.com/p/COejYY9NU2Y/?igshid=1o6et2gp0q1gr
https://www.instagram.com/p/COe4vdvNepL/?igshid=z6w6xy240kpb
Virat Kohli has reached his home after #IPL2021 got suspended – he and Anushka will be doing COVID support movement soon. pic.twitter.com/LyjmNlkLiS
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2021
आता आयपीएल वारी संपल्यानंतर विराट कोरोना पिडीतांची मदत करताना दिसणार आहे. विराटची पत्नी अनुष्काने यासंदर्भात माहिती दिली होती. १ मे रोजी आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याने चाहत्यांचे अभिवादन करणारा एक व्हिडिओ तिने शएअर केला होता. यामध्ये तिने खुलासा केला होता की, ‘या कठीण काळात मी आणि माझा पती विराट मिळून देशाची सेवा करण्यासाठी आमचे योगदान देणार आहोत.’
https://www.instagram.com/p/COXiQ52p3AM/?igshid=7no7lq2556u3
विराटच्या नेतृत्त्वाखालील आयपीएल २०२१ मधील प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले तर, त्याचा संघ यावर्षी दमदार फॉर्ममध्ये होता. हंगामातील सुरुवातीचे सलग ४ सामने जिंकत आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे रणशिंग फुकले होते. त्यानंतर त्यांना २ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु आयपीएल स्थगित होण्यापुर्वी ७ पैकी ५ सामने जिंकत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकर आहेत शेवटी, सगळ्या गोष्टी हटकेच करणार! आयपीएल २०२१चा मुंबई इंडियन्सने ‘असा’ घेतला निरोप
महिला आयपीएल २०२१ स्थगित, पण स्म्रिती मंधानासह ३ भारतीय क्रिकेटर गाजवणार ‘ही’ लीग






