भारताचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) सर्वाधिक फिट असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. तो अनेकदा फिटनेसबद्दल बोलतही असतो. नुकताच विराट इंडियन सुपर लीग (ISL)मधील एफसी गोवा क्लबच्या जर्सी अनावरणासाठी गोव्यामध्ये होता. तो या क्लबचा सहसंघमालक आहे.
यावेळी विराटने फुटबॉल(Football) आणि फुटबॉलपटूंचा प्रभाव क्रिकेटवरही असल्याचे म्हटले आहे.
विराट टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला, ‘आम्ही नेहमीच फुटबॉलपटूंच्या शिस्तीकडे पाहतो. ही खेळाची गरज आहे. मैदानावर तूमचे सर्वोत्तम देण्यासाठी तूम्हाला हा स्तर गाठावा लागेल. फुटबॉलपटू हे शारिरिकदृष्ट्या, पोषणाच्या बाबतीत आणि विश्रांतीच्या बाबतीत अत्यंत प्रोफेशनल असतात. त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकतो.’
असे असले तरी क्रिकेट आणि फुटबॉलची तुलना करु नका असेही विराटने म्हटले आहे कारण दोन्ही खेळाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.
विराट म्हणाला, ‘तूम्ही तुलना करु शकत नाही. मला वाटते की त्यांच्या तुलनेत कोणी जवळ असेल तर ते वेगवान गोलंदाज. क्रिकेट असा खेळ नाही की ज्याच्यासाठी प्रत्येकवेळी शारिरिक ताकदीची गरज असते. फुटबॉलला वेग आहे आणि तो खेळ 90 मिनिटात संपतो. त्यासाठी तूम्हाला पूर्ण फिट असण्याची गरज असते.’
‘क्रिकेटमध्ये फुटबॉलप्रमाणे फिटनेसचा स्तर उच्च असण्याची तेवढी गरज नसते. पण तूम्ही जर फुटबॉलपटूंप्रमाणे फिट असाल तर तूम्ही क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या स्तरावर जाऊन करु शकता. फुटबॉलपटू हे क्रिकेटपटूंपेक्षा अधिक फिट असतात.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून ‘कॅप्टनकूल’ धोनीला आठवले शाळेचे दिवस, पहा व्हिडिओ
–जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली अशी भावूक प्रतिक्रिया
–सांगलीकर स्म्रीती मंधनाने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिलीच भारतीय