कोलकातामध्ये बांगलादेश विरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) काळात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील कठीण आव्हानांना तोंड द्यायला सुरुवात केली.
पण विराटच्या या विधानावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी (Sunil Gavaskar) नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की सध्याचा कर्णधार कोहलीचा जन्म नव्हता झाला तेव्हाही भारतीय संघ जिंकत होता.
मात्र आता भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराट कोहलीला (Virat Kohli) पाठिंबा दर्शविला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की गांगुलीने विजयाची सुरूवात केली होती.
“हे कोहलीचे वैयक्तिक मत आहे. पण गांगुलीच्या नेतृत्वात भारताने परदेशात अधिक विजय मिळवण्यास सुरुवात केली यात काही शंका नाही,” असे गंभीर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला.
“सुनील गावस्कर आणि कपिल देव किंवा इतर कर्णधारांच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर भारत नेहमीच मजबूत होता. पण गांगुलीच्या नेतृत्वात आम्ही विदेशी खेळपट्ट्यांवर अधिक विजय मिळवू लागलो. मला वाटते विराट कोहली ही परंपरा पुढे नेईल,” असेही गंभीर म्हणाला.
भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. तसेच 2 कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने (Test Series Won by 2-0) जिंकली होती. घरच्या मैदानावर भारताने सलग 12 वी कसोटी मालिका जिंकली आहे.
फलंदाजीला जाण्याआधी वॉर्नर, बर्न्स खेळत होते हा खेळ, व्हिडिओ झाला व्हायरल
वाचा👉https://t.co/tWd5y5d0oI👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #AUSvsPAK #DavidWarner #JoeBurns— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ
वाचा👉https://t.co/MTa4Dv58p2👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019