सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय फलंदाजांची गणना होते. भारतीय संघाच्या या २ खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. विराट आणि रोहित या दोघांनीही भारतीय संघासाठी अनेक वेळा सामना जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या दोन्ही फलंदाजांनी कसोटी असो वा वनडे किंवा टी-२० या क्रिकेटच्या सर्वच प्रकारात आपला दरारा निर्माण केला आहे. याबरोबरच त्यांनी आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
खरं तर, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जगातील एकमेव असे दोन फलंदाज आहेत ज्यांनी आयसीसीच्या या सर्व स्पर्धांमध्ये (वनडे विश्वचषक. टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटी चॅम्पियनशीप) सामनावीराचा (मॅन ऑफ द मॅच) पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये रोहित आणि विराट शिवाय जगातील इतर कुठल्याही फलंदाजाला हे यश मिळवता आलेले नाही.
आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये किमान एकदा तरी ‘सामनावीर’ पुरस्कार या दोघांना मिळाला आहे.
सर्वात पहिलं म्हणजे ‘रन मशीन‘ विराटबद्दल बोलू. त्याने आयसीसी वनडे विश्वचषक २०१५ च्या व्यतिरिक्त २०१९ च्या वनडे विश्वचषकात ‘सामनावीर’ पुरस्कार मिळवला. तसेच २००९ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने एकदा हा पुरस्कार जिंकला आहे.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये १ वेळा त्याने हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जिंकला आहे. त्याशिवाय आयसीसी टी२० विश्वचषकात कोहलीने एकदा, दोनदा नव्हे तर ५ वेळा सामवीराचा मान मिळवला आहे.
आता भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माबद्दल जाणून घेऊ. त्याने आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषक २०१५ मध्ये १ वेळा आणि २०१९ विश्वचषकात ४ वेळा सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केला.
तसेच रोहितने आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ मध्ये २ वेळा सामनावीर हा पुरस्कार जिंकला. त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये एकदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. या सोबत रोहितने आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सलग २ वेळा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामनावीर पुरस्कार जिंकला.
वाचनीय लेख –
दुर्दैवी! ९९वर बाद झालेले १० भारतीय क्रिकेटर
असे तीन भारतीय प्रतिभावान क्रिकेटर, जे होऊ शकतात आपल्याच आयपीएल संघाचे कर्णधार
क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकणे सोप्पं नाही, हे ५ महारथी त्यात आहेत माहिर