---Advertisement---

रोहित अन् विराटने एकत्र घेतली श्रीलंकन चाहत्याची भेट! कारण ऐकून तुम्हालाही हेवा वाटेल

On: मंगळवार, ऑगस्ट 30, 2022 1:02 PM
Virat-Kohli-Rohit-Sharma-SriLankan-Fan
---Advertisement---

विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात आहेत. मैदानावर कोहलीचा आक्रमक पवित्रा असला तरी त्याच्या बाहेर तो गंभीर दिसतो. विशेषत: कोहली त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो फॅन्स डे साजरा करतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यानंतर कोहलीने असेच काहीसे केले. त्याचा खास क्रिकेट चाहता ग्यान सेनानायकेला भेटण्यासाठी तो पोहोचला. कोहली एकटा गेला नाही, तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही त्याच्यासोबत उपस्थित होता. 

ग्यान सेनानायकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने लिहिले, आज विराट आणि रोहितची भेट झाली. सेनानायके यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसला आहे. सेनानायके हा श्रीलंका क्रिकेट संघाचा मोठा चाहता आहे. 2011च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून श्रीलंकेचा पराभव त्यांना विसरता आलेला नाही. पण, त्याला विराट आणि रोहितही खूप आवडतात. कोहलीसोबत त्याचे खास नाते आहे. विराट आणि अनुष्का शर्माच्या लग्नाच्या रिसेप्शनलाही तो उपस्थित होता.

https://twitter.com/GayanSenanayke/status/1564230238477107200

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला होता. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानला 147 धावांत गुंडाळले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4 आणि हार्दिक पंड्याने 3 बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि केएल राहुल पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही 10 धावा जोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीने 35 धावा केल्या. पण, नंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली फलंदाजी करत भारताला 5 विकेटने विजय मिळवून दिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराह-शमीची कमतरता आता जाणवणार नाही; भारताचा ‘हा’ गोलंदाज विरोधकांसाठी ‘अकेला ही काफी है!’

लंकादहनानंतर आता बांग्लादेशला नमवायला अफगाणिस्तान सज्ज! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 
उथप्पाला ‘या’ भारतीय खेळाडूत दिसते कॅप्टन कुलची झलक; म्हणाला, ‘भविष्यात…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---