भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हाही सामना खेळला जातो, त्या सामन्यात काही खेळाडूंकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष असतं. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद आमीर यांचा समावेश आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यानं टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी निवृत्तीतून परतण्याची घोषणा केली होती. मात्र, अमेरिकेविरुद्ध विश्वचषकातील पहिल्या सामन्यात तो काही फारशा फॉर्ममध्ये दिसला नाही. तसं पाहिलं तर, आमिरनं यापूर्वी अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्माला त्रास दिला आहे.
या विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आमिरनंच पाकिस्तानसाठी सुपर ओव्हर टाकला होता, ज्यामध्ये त्याला 18 धावा बसल्या होत्या. या सामन्यात आमिर त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत नव्हता. अशा परिस्थितीत तो आज रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कशी गोलंदाजी करतो, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला आमिर विरुद्ध कोहली आणि रोहितचे आकडे कसे आहेत, हे सांगणार आहोत.
मोहम्मद आमिर विरुद्ध रोहित शर्मा – टी20 आतंरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मोहम्मद आमिरविरुद्ध रोहित शर्माची आकडेवारी खूपच खराब आहे. आमिरनं या फॉरमॅटमध्ये रोहितला आतापर्यंत 7 चेंडू टाकले, ज्यामध्ये रोहितनं फक्त 1 धाव काढली असून तो 2 वेळा बाद झाला आहे. आमिरच्या 7 पैकी 6 चेंडूंवर रोहित शर्माला एकही धाव करता आलेली नाही.
मोहम्मद आमीर विरुद्ध विराट कोहली – मोहम्मद आमिरनं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीला 19 चेंडू टाकले आहेत. मात्र आमिर विराट कोहलीला टी20 मध्ये एकदाही बाद करू शकलेला नाही. कोहलीनं आमिरविरुद्ध 19 चेंडूत 84.2 च्या स्ट्राईक रेटनं 16 धावा केल्या आहेत.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतानं पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारतानं 8 गडी राखून सहज विजय मिळवला. दुसरीकडे, पाकिस्ताननं स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात अमेरिकेननं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद
आजच्या सामन्यात कुलदीप यादव खेळला तर पाकिस्तानचं काही खरं नाही! आकडेवारीवरून समजून घ्या
विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis