ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 150 धावांवर ऑलआऊट झालेल्या भारतीय संघानं दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या आणि सामन्यावर मजबूत पकड घेतली.
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची नाबाद भागिदारी केली आहे. या दोघांच्या फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाज खूपच हतबल दिसले. यशस्वीच्या 90 धावा झाल्या असून राहुल 62 धावा करून खेळत आहे. या दोघांची ही फलंदाजी पाहून विराट कोहली देखील खूप प्रभावित झाला आणि त्यानं थेट मैदानात जाऊन दोन्ही खेळाडूंना सलाम केला.
ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल नाबाद परतले. खेळ संपल्यानंतर जेव्हा खेळाडू मैदानातून बाहेर पडत होते, तेव्हा विराट कोहली फलंदाजीच्या सरावासाठी मैदानात गेला. यादरम्यान त्यानं यशस्वी आणि केएलची वाट पाहिली आणि जेव्हा ते जवळ पोहोचले तेव्हा त्यानं त्यांना बोलावलं आणि नंतर सलाम केला. सोशल मीडियावर विराट कोहलीची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. चाहत्यांना ती फार पसंत येत आहे. तुम्ही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Virat Kohli saluting Yashasvi and Rahul 🫡🥰 pic.twitter.com/cm2KNNmxhL
— Atmaram Tukaram Bhide (@BakchodBhide) November 23, 2024
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्या 172 धावांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारतानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहनं पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आणि ऑस्ट्रेलियाला 104 धावांत गुंडाळलं. पहिल्या डावात 150 धावा करणाऱ्या भारतीय संघाकडे 46 धावांची आघाडी होती. पहिल्या डावात यशस्वी भोपळाही फोडू शकला नव्हता. तर राहुल 26 धावा करून वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला होता.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 विदेशी गोलंदाज, बुमराहनं मोडला वसीम अक्रमचा रेकॉर्ड!
यशस्वी जयस्वाल बनला कसोटी क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’, मॅक्युलमचा रेकॉर्ड उद्ध्वस्त!
पर्थ कसोटीत टीम इंडियाचा दबदबा, यशस्वी-राहुलच्या जोरावर भारताकडे 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी