डब्लिन। 27 जूनला भारताने आयर्लंड विरुद्ध 76 धावांनी विजय मिळवत आयर्लंड-इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली.
या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमवारीतही बदल झाल्याचे पहायला मिळाले. या सामन्यात सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर, एमएस धोनी चौथ्या, हार्दिक पंड्या पाचव्या आणि स्वत: कोहली सहाव्या क्रमांकावर खेळायला आला होता.
या बदलेल्या क्रमवारीबद्दल सामना संपल्यावर कर्णधार कोहली म्हणाला, “मधली फळी अशी आहे की आम्ही टी20 सामन्यात त्यात काही प्रयोग करु शकतो.”
तसेच त्याने फक्त आयर्लंड विरुद्धच नाही तर इंग्लंड विरुद्धही हे प्रयोग करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे बदल करणार असल्याचेही कोहली म्हणाला.
पुढे कोहली म्हणाला, ” आम्ही प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्यचकीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच फलंदाजांना या क्रमवारीतील बदालाविषयी विचारल्यावर त्यांनीही यासाठी चांगला प्रतिसाद दिला.”
“आम्ही या दोन सामन्यांचा उपयोग सर्वांना संधी देण्यासाठी करत आहोत. मी आधीच खेळाडूंना सांगितले आहे की ज्यांना या सामन्यात संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या सामन्यात संधी दिली जाईल.”
या सामन्यात भारताच्या संघातील दिनेश कार्तिक, केएल राहुल, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि सिद्धार्थ कौलला 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना 29 जूनला होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाकिस्तान-आॅस्ट्रेलियापेक्षा टी२०मध्ये भारतीय संघच सरस!
–स्मिथचा बियर पितानाच्या व्हायरल फोटोवरुन डॅरेन सॅमी उखडला!
–टाॅप ५- या देशांच्या खेळाडूंनी केल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा