आज प्रजासत्ताक दिवस म्हणजेच (26 जानेवारी 2025), संपूर्ण भारतभर आज 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतासाठी हा खूप खास दिवस आहे. कारण 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. तत्पूर्वी या खास दिवशी क्रिकेटशी संबंधित अनेक आठवणी आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचे प्रचंड वर्चस्व राहिले आहे. पण या महत्त्वाच्या दिवशी, भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांमध्ये, शतक करणारा फक्त एकच फलंदाज आहे. होय, आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनी, फक्त एकच फलंदाज असा आहे ज्याने प्रजासत्ताकदिनी शतक झळकावले होते.
(26 जानेवारी) रोजी भारतासाठी कोणत्या फलंदाजाने शतक झळकावले आहे? या खास दिवशी, शतकाचा राजा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) , सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), राहुल द्रविड (Rahul Dravid) किंवा महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) नाही, तर या दिवसाचा शतकाचा राजा भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा विराट कोहली (Virat Kohli) आहे.
भारताच्या इतिहासात आतापर्यंत फक्त विराट कोहलीलाच (Virat Kohli) प्रजासत्ताक दिनी शतक ठोकण्याचा रेकाॅर्ड करता आला आहे. त्याने 2012 मध्ये ही अद्भुत कामगिरी केली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड येथे कसोटी सामना खेळला गेला. जिथे विराटने 26 जानेवारी रोजी आपले शतक पूर्ण केले. हा खास दिवस स्वतःसाठी खास बनवला. या सामन्यात विराटच्या बॅटमधून 213 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार निघाला होता. दरम्यान विराटने 116 धावांची खेळी केली होती. हे विराट कोहलीचे पहिले कसोटी शतक होते.
26 जानेवारी रोजी, अनेक भारतीय फलंदाज शतकाच्या जवळ पोहोचले पण शतक झळकावू शकले नाहीत. त्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) सारखे खेळाडू होते, जे शतकाच्या जवळ पोहोचले होते. सचिनने श्रीलंकेविरुद्ध 96 धावा केल्या. तर धोनीने 2010 मध्ये आजच्याच दिवशी बांगलादेशविरुद्ध 89 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ स्टार खेळाडूने जिंकला ‘आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार..!
संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघातून बाहेर पडला ‘हा’ खेळाडू
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार का? पाहा लेटेस्ट अपडेट!