यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) फायनल सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला चितपट केलं. बार्बाडोसच्या मैदानावर भारतानं तिरंगा रोवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 13 वर्षांनंतर भारतानं आयसीसीच्या ट्राॅफीवर नाव कोरले. भारतानं विश्वचषक तर जिंकलाच पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तत्पूर्वी विराट कोहलीनं जाता-जाता एक विक्रम त्याच्या नावी केला.
टी20 विश्वचषकाची स्पर्धा सुरु झाल्यापासून विराटचा फाॅर्म भारतासाठी पुन्हा चिंतेचा विषय बनला होता. कोहलीनं पहिल्या 3 सामन्यात 5 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं होतं परंतू कोहलीनं फायनल सामन्यात त्याचा जलवा दाखवला. कोहलीनं 59 चेंडूत 76 धावांची शानदार खेळी खेळली. त्यामध्ये 2 षटकार तर 6 चौकार ठोकले आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 38वं अर्धशतक झळकावलं. कोहली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, अर्धशतक ठोकणारा सध्या एकमेव खेळाडू आहे.
विराट कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 125 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 48.69च्या सरासरीनं 4188 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 राहिली आहे. 125 सामन्यात त्यानं 38 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे.
सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमनं 123 सामन्यात 36 अर्धशतक झळकावली आहे. तर 3 शतक झळकावली आहेत. 123 सामन्यात त्यानं 4145 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यानं त्याची सर्वोच्च धावसंख्या 122 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्माच्या जागी…”, भारतानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची प्रतिक्रिया
3 खेळाडू जे भारताच्या टी20 संघात विराट कोहलीची जागा घेऊ शकतात
“आता मी बेरोजगार झालो”, राहुल द्रविड यांनी जाता-जाता दिली भावनिक प्रतिक्रिया