श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात चाहत्यांना विराट कोहली (Virat Kohli) याची वादळी खेळी पुन्हा पाहायला मिळाली. भारत आणि श्रीलंका यांत्याली वनडे मालिकेतील विराटचे हे दुसरे शतक असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 74 वे शतक ठरले. विराटने रविवारी (15 जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये केळल्या गेलेल्या सामन्यात 48 चेंडूत अर्धशतक, तर 85 चेंडूत शतक केले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि शुबमन (Shubman Gill) गिल या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत संघाचा चांगली सुरुवात दिली. उभय संघांतील या सामन्यात विराट भारतासाठी शतक करणारा दुसरा फलंदजा ठरला. त्याच्या आदीत शुबमन गिल याने संघासाठी 97 चेंडूत 116 धावा केल्या होत्या. सत कर्णधार रोहित शर्मा याने 49 चेंडूत 42 धावा केल्या. विराटने डावातील 44 व्या षटकात स्वतःचे शतक पूर्ण केले. विराट आणि शुबमनच्या वादली केळीच्या जोरावर भारताने या सामन्यात मोठी धावसंख्या उभी केली. विराटने या सामन्यूत एकूण 110 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 166 धावा कुटल्या. विराट आणि शुबमनच्या शतकाच्या जोरावर भारताने 390 धावा साकारल्या.
विराट या शतकानंतर एका खास यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. एका संघाविरुद्ध शर्वाधिक वनडे शतके करणाऱ्यांच्या यादीत त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे. त्याने श्रीलंकन संघाविरुद्ध एकूण 10 शतके केली असून यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. दुसऱ्या क्रमांकावर देखील विराटचेच नाव आहे. वेस्ट इंडीजविरुद्धध केलेल्या 9 वनडे शतकांसाठी त्याला दुसऱ्या क्रमांकावर देखील संधी मिळाली आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिचनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वनडे शतके केली आहेत.
विराट कोहली नेहमीच सचिनच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्यासाठी प्रमुख दावेदार राहिला आहे. त्याने रविवारी (15 जानेवारी) कारकिर्दीतील 74 वे शतक ठोकल्यानंतर सचिनच्या विक्रमाच्या अधिकच जवळ गेला आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 100 शतके केली आहेत. विराट सध्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या 70 आंतराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. मागच्या चार वनडे डावांमध्ये विराट कोहलीने केलेले हे तिसरे शतक आहे. (Virat Kohli scored his 74th international century in the third ODI against Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद केला पण पुरा केला! ब्रेविसने मायदेशातील टी20 लीगमध्ये भिरकावला ‘नो लूक सिक्स’, पाहा व्हिडिओ
श्रीलंकेविरुद्ध मैदानात पाय टाकताच विराटचे अर्धशतक, सचिन-धोनीसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील