भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तसेच जगभरातील अनेक मैदानावर त्याने आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला आहे. येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत देखील विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. सध्याच्या सक्रिय भारतीय संघात विराट कोहली हा इंग्लंड संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
विराट कोहलीने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याने ३५.६३ च्या सरासरीने ७८४ धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने एमएस धोनीला देखील मागे टाकले आहे. धोनीने १२ कसोटी सामन्यात ३७.०४ च्या सरासरीने ७७८ धावा केल्या आहेत. तसेच कोहलीने इंग्लंडमध्ये २ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले आहेत.(Virat Kohli scored most runs against England in England in current Indian team)
सचिनच्या नावे इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा
इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकीर्दीत इंग्लंडमध्ये १७ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने १५७५ धावा केल्या होत्या. तसेच राहुल द्रविडने १३ कसोटी सामन्यात १३७६ धावा केल्या होत्या. तर विराट कोहली हा इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज आहे.
विराटला वगळता इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत इतर एकाही सक्रिय क्रिकेटपटूचा समावेश नाही. उपकर्णधार अजिंक्य रहाणे ६२० धावांसह अकराव्या क्रमांकावर आहे.
कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांना दिलाय खूप चोप
याखेरीज विराटने केवळ इंग्लंडमध्येच नव्हे तर इंग्लंडच्या बाहेरही इंग्लंड संघाच्या गोलंदाजांचा धू धू धुतले आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध २३ कसोटी सामन्यात १७४२ धावा चोपल्या आहेत. यासह तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती, मग आम्हाला इंग्लंडमध्ये वेगवान पीच बनवण्याचा हक्क आहे”
कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना? जाणून घ्या सर्वकाही
वडिलांच्या आठवणीने आजही विराट होतो भावूक; म्हणाला, ‘आज ते इथे असते तर..’