मँचेस्टर। आज(16 जून) 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु असलेल्या 22 व्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 51 वी अर्धशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने खास विश्वविक्रमही केला आहे.
विराटने या सामन्यात त्याच्या खेळीतील चौकार ठोकत 60 धावा पूर्ण करताच वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्याआधी त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 57 धावांची गरज होती.
वनडेमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट जगातील 9 वा तर भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. भारताकडून वनडेत 11 हजार धावा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने केल्या आहेत.
याबरोबरच विराट सर्वात जलद 11 हजार वनडे धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. विराटने 222 व्या वनडे डावात हा टप्पा पार केला आहे. याबरोबरच त्याने हा विश्वविक्रम करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने 276 डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
त्यामुळे विराटने 11 हजार वनडे धावांचा टप्पा गाठताना सचिनपेक्षा तब्बल 54 डाव कमी खेळले आहेत.
विराटने आज त्याचे हे 51 वे वनडे अर्धशतक 51 चेंडूत पूर्ण केले आहे. तसेच त्याने रोहित शर्माबरोबर या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचली आहे. त्यानंतर त्याने हार्दिकबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली आहे.
विशेष म्हणजे विराट कोहलीच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8 हजार, 9 हजार आणि 10 हजार धावा करण्याचाही विश्वविक्रम आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करणारे फलंदाज –
222 डाव – विराट कोहली
276 डाव – सचिन तेंडुलकर
286 डाव – रिकी पाँटिंग
288 डाव – सौरव गांगुली
293 डाव – जॅक कॅलिस
318 डाव – कुमार संगकारा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तिकीटांची मागणी करणाऱ्या चाहत्यांना विराट कोहलीने दिला मजेशीर संदेश, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: ‘द वॉल’ राहुल द्रविडला मागे टाकत एमएस धोनीने केला हा खास पराक्रम
–विश्वचषक २०१९: आजच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया