टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) एका छोट्या विश्रांतीवर होता. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले आणि संघाचे नेतृत्व करताना सामन्यात विजयही मिळवून दिला. विराटने मिळवून दिलेल्या विजयानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला. त्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-२० मालिकेत भारताने ३-० असा विजय मिळवला होता. भारतीय संघाला आगामी काळाता दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे, त्यात्पूर्वी विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो आणि चाहत्यांसाठी नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. आता त्याने एक मजेदार फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीला पडत असल्याचे दिसत आहे. विराटने हा फोटो त्याच्या अधिकृत कू अकाउंट वरून शेअर केला आहे. फोटोत तो स्वतःला दुचाकी गाडीवर बसल्यासारखा दाखवत आहे, पण ही खरीखुरी दुचाकी नसून जुन्या बुलेटसारखे दिसणारे कार्डबोर्डचे कटआउट आहे. या कटआउटला विराटने खऱ्या दुचाकीसारखे पकडले आहे, आणि तो वेगात ही दुचाकी चालवत असल्यासारखा दिसत आहे.
विराटने कू ऍपवर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोत विराटने डोक्यात हेलमेट घातल्याचे देखील दिसत आहे. हा मजेदार फोटो शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कोणे एकेकाळची गोष्ट आहे.” या कॅप्शनसोबतच त्याने दोन हॅशटॅग देखील दिले आहेत. एकामध्ये त्याने लिहिले की “८० च्या दशकातील मुलं” तर दुसऱ्या हॅशटॅगमध्ये त्याने लिहिले की, “बॅक इन द डेज.”
चाहत्यांना विराटचे हे रूप खूपच भावल्याचे दिसते. चाहते विराटच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत आणि कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्तही होत आहेत.
दरम्यान, विराट काही वर्षांपूर्वी एका दुचाकीसाठी जाहिरात शुट करत होता. त्यावेळी तो म्हटला होता की, दुचाकी चालवून काही महिने झाले आहेत. पण जेव्हा रस्ते मोकळे असतील, तेव्हा सवारी करणे नेहमीच मजेदार असतं. विराट त्यावेळी म्हटला होता की, तो अजूनही दुचाकी चालवण्याचा आनंद घेतो आणि त्याला लाँग ड्राइव्हवर जायला आवडते.
विराटला दुचाकी वाहनांविषयी आकर्षण असल्याचे यापूर्वी पाहिले गेले आहे. २०१२ मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या एका टी-२० सामन्यानंतर कोहली आणि एमएस धोनीला दुचाकीची चक्कर मारताता पाहिले केले होते. एमएस धोनी त्यावेळी दुचाकी चालवण्यासाठी पुढे बसलेला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय