---Advertisement---

हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय

On: गुरूवार, डिसेंबर 9, 2021 9:14 AM
hardik-pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी तो मोलाचे योगदान देत होता. परंतु, गेल्या १ वर्षापासून त्याला फिटनेसच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय. या दरम्यान भारतीय संघाकडून खेळताना आणि आयपीएल स्पर्धेत देखील त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. हेच कारण आहे की, त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भारतीय संघ सध्या अशा खेळाडूच्या शोधात आहे, जो वेगवान गोलंदाजी करू शकेल आणि फलंदाजी आल्यास तुफान फटकेबाजी देखील करू शकेल. हेच कारण आहे की, हार्दिक पंड्या लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतो.

हार्दिक पंड्याने भारताच्या वनडे, टी२० आणि कसोटी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु, एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, हार्दिक लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. कारण, त्याला आपले संपूर्ण लक्ष वनडे आणि टी२० क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे. त्याने भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये खेळला होता.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “हार्दिकला गेल्या काही कालावधीपासून दुखापतीचा सामना करावा लागतोय. मात्र, त्याने अधिकृतरित्या याबाबत कुठलीही माहिती दिली नाहीये. तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल. तसं तर तो आमच्या कसोटी क्रिकेटच्या योजनेत सहभागी नव्हता. नक्कीच हे भारतीय संघाचे मोठे नुकसान असेल पण आम्हाला बॅकअप तयार करावा लागेल.”

हार्दिक पंड्याची कसोटी कारकीर्द 

हार्दिक पंड्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १ शतकाच्या साहाय्याने ५३२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने १७ गडी बाद केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

ज्याच्या पुनरागमनाची झाली भरपूर चर्चा, त्याच स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सपुढे अशी टाकली नांगी- Video

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती

Video: ऍशेसच्या पहिल्याच चेंडूवर पडली विकेट, ८५ वर्षांनंतर अद्वितीय विक्रम घडताना पाहून समालोचकही थक्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---