---Advertisement---

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती

Team India
---Advertisement---

डिसेंबर २०२१ -जानेवारी २०२२ दरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करणार आहे. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील सुरुवातीच्या कसोटी मालिकेसाठी बुधवार रोजी (०८ डिसेंबर) भारताच्या वरिष्ठ निवड समितीने १८ सदस्यीय संघाची (India’s 18 Members test Squad) घोषणा केली आहे. तसेच राखीव खेळाडूंमध्ये ४ गोलंदाजांना ठेवण्यात आले आहे.

कसोटी मालिकेसाठी संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे विराट कोहलीच्या हातीच राहतील. परंतु महत्त्वपूर्ण बदल म्हणजे, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला उपकर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. असे असले तरीही, त्याला खेळाडूच्या रूपात संघात जागा देण्यात आली आहे. रहाणेच्या जागी सलामीवीर रोहित शर्मा याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याबरोबरच मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये अर्थातच वनडे आणि टी२० मध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल.

सलामीवीर म्हणून रोहितबरोबरच मयंक अगरवाल आणि केएल राहुल यांना निवडण्यात आले आहे. शुबमन गिल दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकला आहे. तसेच हनुमा विहारी याचेही संघात पुनरागमन झाले आहे.

वेगवान गोलंदाजांमध्ये अनुभवी इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराजचीही निवड करण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरला जागा मिळाली आहे. फिरकी गोलंदाजी विभागात आर अश्विन आणि जयंत यादव यांचा समावेश आहे.

राखीव खेळाडूंमध्ये नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चाहर आणि अर्झान नागवासवल्ला यांना संधी देण्यात आली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1468577644656484360?s=20

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन

वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन

महत्त्वाच्या बातम्या-

ज्याच्या पुनरागमनाची झाली भरपूर चर्चा, त्याच स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सपुढे अशी टाकली नांगी- Video

साजिद खानने बांगलादेशी फलंदाजांची पळता भुई थोडी, पाकिस्तानचा दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा

Video: ऍशेसच्या पहिल्याच चेंडूवर पडली विकेट, ८५ वर्षांनंतर अद्वितीय विक्रम घडताना पाहून समालोचकही थक्क

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---