इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम (आयपीएल) संपायला आला आहे. रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळला जाणार आहे. राजस्थान संघाने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. परिणामी आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशाप्रकारे १५ वर्षांनंतरही त्यांचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. यानंतर आरसीबी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने संघाच्या चाहत्यांसाठी भावूक ट्वीट केले आहे.
आरसीबीचे (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या पंधराव्या (IPL 2022) हंगामातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराटने (Virat Kohli) चाहत्यांच्या हृदयाला भिडणारी (Virat Kohli Heartwarming Message) पोस्ट केली आहे. विराटने त्याच्या संदेशात लिहिले आहे की, “कधी तुम्ही जिंकता आणि कधी पराभूत होता. परंतु १२वा मॅन आर्मी म्हणून तुम्ही लोक शानदार राहिले आहात. नेहमीच आम्हाला पाठिंबा देत राहा. तुम्ही आमच्या कठीण काळातही आमचा आत्मविश्वास वाढवला. तुम्ही क्रिकेटला अजून खास बनवले.”
“शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबत नाही. संघ व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि आरसीबी फ्रँचायझीशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचे धन्यवाद. पुढील हंगामात परत भेटू,” असेही त्याने लिहिले आहे.
A big thanks to the management, support staff and all the people who are part of this amazing franchise. See you next season ❤️ @RCBTweets #PlayBold (2/2)
— Virat Kohli (@imVkohli) May 28, 2022
विराटने चालू हंगामात केल्या आहेत ३०० पेक्षा जास्त धावा
दरम्यान धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसलेल्या विराटने (Virat Kohli Poor Performance) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात १६ सामने खेळताना २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतके केली आहेत. तसेच ७३ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे. तो चालू हंगामात बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसराच फलंदाज आहे. फाफने बेंगलोरकडून १६ सामने खेळताना सर्वाधिक ४६८ धावा केल्या आहेत.
बेंगलोरच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा
बेंगलोर संघ यंदा आयपीएल चषक विजयाचा प्रबळ दावेदार वाटत होता. फाफच्या नेतृत्त्वाखाली १४ पैकी ८ सामने जिंकत बेंगलोरने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तसेच प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सला पराभूत करत दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचेही तिकीट मिळवले. मात्र दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बेंगलोरवर ७ विकेट्सने मात करत पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांना चुराडा केला आहे.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Final । केव्हा आणि कुठे पाहाल गुजरात वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही