विराट कोहलीचं नवं आलिशान घर बनून तयार आहे. कोहलीनं त्याच्या ‘X’ अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यानं त्याच्या नवीन घराची झलक दाखवली आहे. कोहलीचं हे नवीन घर अलिबागमध्ये बांधलं आहे, ज्याचं इंटीरियर खूप उत्कृष्ट आहे. हे घर बनवण्यासाठी विराट कोहलीनं कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. त्यानं हे त्याचं स्वप्नातील घर असल्याचं म्हटलं आहे.
विराट कोहलीच्या या घराबाबत बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत होत्या. आता कोहलीनं स्वतः याबाबत माहिती दिली आहे. विराट कोहलीनं त्याच्या ‘X’ हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यानं या आलिशान बंगल्याची झलक दाखवली. या आलिशान बंगल्यात स्विमिंग पूल, एक मोठं गार्डन आणि इतर अनेक सुविधा असल्याचं दिसतंय. कोहलीनं सांगितलं की, त्याला या घरात राहण्याची जागा आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सर्वात जास्त आवडला. व्हिडिओमध्ये घराचं इंटीरिअर दाखवण्यात आलं आहे, जे खूपच सुंदर दिसतंय.
The journey of building my Alibaug home has been a seamless experience, and seeing it all come together is truly gratifying. Huge thanks to the entire Avas team for making our dream home a reality. Can’t wait to enjoy every moment here with my loved ones!#avaswellness… pic.twitter.com/x17iL3ETfM
— Virat Kohli (@imVkohli) July 9, 2024
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे, ज्यापैकी घर बांधण्यासाठी सुमारे 13 कोटी रुपये आणि जमीन घेण्यासाठी 19-20 कोटी रुपयांचा खर्च आला. कोहलीचा हा बंगला आवास कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधला असून तो सुमारे दोन वर्षांत बांधून तयार झाला.
विराट कोहलीचं हे तिसरं घर आहे. कोहलीचं मुंबईत एक आलिशान घर आहे. याशिवाय त्याचं गुरुग्राममध्येही मोठं घर आहे. आता कोहलीनं आणखी एक घर बांधलं आहे. अलीकडेच विराट कोहली पत्नी अनुष्कासह लंडनला शिफ्ट होणार, अशा बातम्या आल्या होत्या. मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या सर्व चर्चांवर पूर्णविराम बसला आहे. विराट कोहली आता त्याच्या या स्वप्नातील बंगल्यात राहण्यास तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाऊस कितीही असो, मॅच कधीच थांबणार नाही! येथे बनत आहे जगातील पहिलं अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम
टीम इंडियाला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’, अभिषेक शर्मानं मोडला हिटमॅनचा मोठा विक्रम
विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवर पोलिसांची कारवाई, रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता धुमाकूळ