fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

. . . म्हणून विराटने अनुष्काशी घटस्फोट घ्यावा, भाजप आमदाराचे धक्कादायक विधान

Virat Kohli Should Divorce Anushka Sharma, Says BJP MLA Who Filed Complaint Against Actress for Paatal Lok

मुंबई ।  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची पत्नी अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. शाहरुख खानसोबत ‘झिरो’ हा शेवटचा चित्रपट केला होता. सध्या ती प्रोड्यूसरच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे. नुकतेच तिने ‘पाताळ लोक’ या वेब सिरीजची निर्मिती केली. जी सर्वाधिक चर्चेमध्ये आहे. सोशल मीडियावर या वेब सिरीजचे कौतुक करण्यात आले. तसेच काही कारणामुळे ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

यूपीचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी अनुष्का शर्मा हीने विनापरवानगी फोटो वापरल्याची तक्रार केली आहे. नंदकिशोर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की भारतीय कर्णधार विराट कोहली हे देशभक्त आहेत. आपली देशभक्ती दाखवून पाताळ लोक ही वेबसिरीज बनवल्याबद्दल अनुष्का शर्माला घटस्फोट द्यायला पाहिजे.

नंदकिशोर पुढे बोलताना म्हणाले की, वेब सीरिजमध्ये वापरण्यात आलेले कंटेंट यावर देखील अनुष्का शर्मावर कारवाई होणे गरजेचे आहे.  वेब सिरीजमध्ये बाळकृष्ण वाजपेयी नावाच्या व्यक्तीबरोबर एका नेत्याचा रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचा आणि अन्य बीजेपीच्या नेत्यांचा फोटो दाखवण्यात आलेला आहे. त्यांच्या मते,  ते आमदार आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय असा फोटो वापरता येत नाही. विराट कोहली हा देशासाठी खेळतो आणि तो देशभक्त आहे. त्यांनी तात्काळ अनुष्काला घटस्फोट  द्यायला हवे.

दुसरीकडे पाताळ लोक या वेब सीरिजमध्ये पोलिसाची भूमिका चांगली केल्याने जयदीप अहलावत सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. महिला कुस्तीपटू बबिता फोगट हिने देखील या दमदार अॅक्टिंगची फॅन झाली आहे. तिने अनुष्का शर्माला ट्विट करून धन्यवाद दिले.

You might also like