इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर आहे. याचे कारण असे की, इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली. पण, तरी तिसऱ्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी दाखवलेल्या धैर्याने अजूनही भारताच्या आशा जिवंत आहेत. तिसऱ्या दिवसाखेर भारताने २ बाद २१५ धावा केल्या असून अजून भारत १३९ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, विराट कोहली या मालिकेत संघर्ष करताना दिस आहे.
असे असले, तरी त्याचे चाहते मात्र, स्टेडीयममध्ये येऊन त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला कारण,भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. या दरम्यान रोहितने सर्वाधिक १९ तर अजिंक्य रहाणेने १८ धावांचे योगदान दिले होते.
या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली अवघ्या ७ धावा करत माघारी परतला होता. यावेळी देखील तो जेम्स अँडरसनच्या जाळ्यात अडकला होता. परंतु, या कठीण काळात चाहते त्याची साथ सोडत नाहीये. या सामन्यादरम्यान एका चाहत्याच्या फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो विराट कोहलीचे हाताने काढलेले चित्र दाखवताना दिसून येत आहे. या चाहत्याच्या मागे इंग्लिश प्रेक्षक हसताना दिसून येत आहेत. (Virat Kohli sketch during headingley test,watch English fans reaction)
Someone in the crowd with Virat Kohli's sketch. pic.twitter.com/eKa3Wjx0B9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2021
Virat Kohli's Sketch. #INDvENG pic.twitter.com/pdHPyN3klp
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 26, 2021
भारतीय संघाचा पहिला डाव ७८ धावांवर संपुष्टात
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला होता. संघातील मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात अवघ्या ७८ धावा करता आल्या.या डावात रोहित शर्माने सर्वाधिक १९ तर अजिंक्य रहाणेने १८ धावांचे योगदान दिले. तर इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन आणि ओवरटन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिकने केला समालोचनाला रामराम! ‘हे’ आहे कारण
क्रिस केर्न्सच्या प्रकृतीत झाला बिघाड; शस्त्रक्रियेनंतर पायाकडील भागांना मारला लकवा
जेव्हा विवियन रिचर्ड्स लिटिल मास्टरला म्हणाला होता, “यू आर मेड ऑफ स्टील मॅन”