काल राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर १९ धावांनी मात करत या मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद अर्धशतक केले. तसेच बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतकी खेळी केली.
ही अर्धशतकी खेळी अनेक अर्थांनी खास राहिली. कोहलीची ही आयपीएलमधील वैयक्तिक सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी ठरली. त्याने काल केवळ २६ चेंडूत हे अर्धशतक केले.
यापुर्वी त्याने २०१३ मध्ये चेन्नई तर २०१६मध्ये पंजाबविरूद्ध १८ चेंडूत अर्धशतक केले होते.
ही अर्धशतकी खेळी करताना त्याने टी२० मधील ५३वे अर्धशतक झळकावले. भारतीय खेळाडूने टी२० केलेले हे विक्रमी अर्धशतक ठरले. गौतम गंभीरनेही टी२०मध्ये ५३ अर्धशतके केली आहेत.
विराटने १४४ डावात अायपीएलमध्ये ३७.४१च्या सरासरीने ४५२७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये केवळ रैनाने ४५०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने १५९ डावात ३३.७६च्या सरासरीने ४५५८ धावा केल्या आहेत.