भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाणार आहे. उभय संघांतील हा सामना लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. 2013 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफीसाठी आवढा आशेला लागला आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात विराट कोहली आणि स्टीव स्मिथ आपल्या नावावर मोठा विक्रम करू शकतात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दोन्ही संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने सामने आहेत. तसे पाहिले, तर विजेतेपसाठी दोन्ही संघ विजेतेपदासाठी भक्कम दावेदार आहेत. मात्र, इंग्लंडच्या परिस्थितीचा फायदा भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन संघाला अधिक मिळेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. खासकरून स्टीव स्मिथ (Steve Smith) विरुद्ध भारतीय गोलंदाजांना खास रणनीती आखावी लागू शकतो. दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) याचा फॉर्म ऑस्ट्रेलियन संघासाठी घातक ठरू शकतो. या दोघांमुळे ऑस्ट्रेलिया आणि भारताचे माजी माजी दिग्गज रॉकी पाँटिंग आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचे विक्रम मोडीत निघू शकतात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांचा विचार केला, तर सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 11 शतके केली आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या सुनील गावसकर आणि रिकी पाँटिंग आहेत. गावसकर आणि पाँटिंग यांनी प्रत्येकी 8-8 शतके केली आहेत. विराट आणि स्टीव स्मिथ यांनीही प्रत्येकी 8-8 शतके केली असून ते या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्याच क्रमांकावर आहेत. गावसकर आणि पाँटिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असून यावेळी विराट आणि स्मिथकडे त्यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट किंवा स्मिथने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात एक शतक केले, तर तो खेळाडू तीन खेळाडूंना मागे टाकत यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. (Virat Kohli-Steve Smith duo has a chance to break the record of Sunil Gavaskar-Ricky Ponting)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
1. सचिन तेंडुलकर – 11 शतकं (3630 धावा)
2. रिकी पाँटिंग – 8 शतक (2555 धावा)
3. विराट कोहली – 8 शतक (1979 धावा)
4. स्टीव स्मिथ – 8 शतक (1887 धावा)
5. सुनील गावसकर – 8 शतक (1550 धावा)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
कुस्तीपटूंना विश्वविजेत्यांची साथ! 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाने दिले खास निवेदन
WTC फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या युवा गोलंदाजाचा एल्गार, म्हणाला, “भारताविरुद्ध मी…”