आज विराट कोहलीसाठी कोणताच परिचय देण्याची गरज नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने पूर्ण क्रिकेटविश्वात आपले नाव कमवाले आहे. विराट कोहलीला ‘रनमशीन कोहली’ असे म्हणूनही संबोधले जाते. याच विराट कोहलीचा क्रिकेट प्रवासही काही सोपा राहिलेला नाही.
विराट कोहली लहानपणी आपले वडील प्रेम कोहलींच्या खूप जवळ होता. परंतु त्याने आपल्या वडिलांना खूप कमी वयात गमावले आहे. विराट कोहलीच्या जीवनातील एक अशी घटना जी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि जी अत्यंत वेदनादायक होती.
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने एमी पुरस्कार विजेता पत्रकार ग्राहम बेनसिंगर यांना मुलाखत देताना आपले वडीलप्रेम व्यक्त केले. तो म्हणाला, “मी रणजी ट्रॉफीचा सामना खेळत होतो आणि जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला माझ्या संघासाठी फलंदाजी करायची होती. सकाळी अडीच वाजता माझ्या वडिलांचे निधन झाले होते.”
विराट कोहली पुढे म्हणाला, “मी माझ्या वडिलांना शेवटचा श्वास घेताना बघितले होते. त्यावेळी आम्ही आजूबाजूच्या डॉक्टरांकडे गेलेलो. परंतु कोणीच दरवाजे उघडले नव्हते. त्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. परंतु तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचे निधन झाले होते आणि डॉक्टरांना त्यांना वाचवता आले नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सर्व सदस्य रडू लागले. पण माझ्या डोळ्यांतून अश्रू येत नव्हते आणि कारण तो माझ्यासाठी एकप्रकारचा धक्का होता.”
१९ सप्टेंबर २००६ रोजी विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण हे ब्रेन स्ट्रोक होता. विराट कोहली तेव्हा फक्त १८ वर्षांचा होता. त्याने दिल्ली विरुद्ध कर्नाटक यांच्यात झालेल्या सामन्यानंतरच आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात हजेरी लावली होती. त्या सामन्यात विराट कोहलीने ९० धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने भारतसाठी खेळतांना कसोटी क्रिकेटमध्ये ९१ सामन्यात ५२.३८ च्या सरासरीने ७४९० धावा केल्या आहेत. त्याने वनडे क्रिकेटमध्ये २५४ सामन्यात ५९.०६ च्या सरासरीने १२१६९ धावा केल्या आहेत. त्यात ४३ शतक आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० मध्ये त्याने भारतासाठी ८४ सामन्यात ५२.६५ च्या सरासरीने ३१५९ धावा केल्या आहेत. त्यात २८ अर्धशतकांची नोंद आहे. कोहली हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नेतृत्व करतो.
तो सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे. आता इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या सरावामध्ये व्यस्त आहे.
महत्वाच्या बातम्या
“एक काळ असा होता की, भारत आणि पाकिस्तान मालिकेला प्रतिष्ठेच्या ऍशेसपेक्षा जास्त पाठिंबा मिळायचा”
‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर
झारखंडचा ‘हा’ खेळाडू सापडलाय आर्थिक संकटात, शेती करून भरतोय पोट