कसोटी क्रिकेट हा संयम, जिद्द आणि दृढ इच्छाशक्तीचा खेळ आहे. यापूर्वी असे अनेक खेळाडू आले आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ दाखविल्याबद्दल खूप कौतुक झाले. मात्र, काळानुसार क्रिकेटचे स्वरूपही बदलले. विशेषत: टी२० च्या आगमनानंतर क्रिकेट पूर्णपणे बदलले आहे. काही चाहते कसोटी क्रिकेटमधील तज्ञ खेळाडूंना कमी लेखतात. अशीच काहीशी अवस्था भारतीय कसोटी संघातील तज्ज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराचीही आहे. ट्विटरवर एका चाहत्याने पुजाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूने त्याची बाजू लावून धरली.
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केला पुजाराचा बचाव
सध्या अनेक खेळाडू फावल्या वेळात सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गप्पा मारताना दिसून येतात. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग यानेदेखील नुकताच ट्विटरवरून चाहत्यांशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावर एका चाहत्याने प्रश्न विचारताना म्हटले की, पुजारा हा कसोटीच्या मानाने खूपच हळू खेळतो का?
या प्रश्नाचे उत्तर देताना हॉग म्हणाला, “मला असे अजिबात वाटत नाही. प्रत्येक संघाला अशा फलंदाजाची गरज असते आणि पुजारा त्याच्या खेळाचा आनंद लुटतो. त्याचा संयम आणि चिकाटी आश्चर्यकारक आहे. तो तासनतास फलंदाजी करू शकतो. कसोटी क्रिकेटसाठी हे आवश्यक आहे. फलंदाज म्हणून या गुणवत्तेबद्दल आपण त्याचे कौतुक केले पाहिजे.”
हॉगने पुजाराचे कौतुक करताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या कामगिरीचा दाखला देखील दिला. पुजाराने या कसोटी मालिकेत ८ डावांत ३३.५८ च्या सरासरीने २७१ धावा केल्या होत्या.
https://twitter.com/Brad_Hogg/status/1402107294079348741
न्यूझीलंड ठरेल विजेता
या संवादादरम्यान एका चाहत्याने आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा निकाल काय लागेल असे विचारले असता हॉग म्हणाला, “भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजयी संघ निवडणे सोपे नाही. दोन्ही संघ गेल्या काही वर्षांपासून चांगले खेळत आहेत. पण माझ्या दृष्टीने न्यूझीलंडच्या विजयाची शक्यता जास्त आहे. कारण, हा संघ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. अंतिम सामन्याच्या तयारीसाठी हे फार महत्वाचे आहे.”
Tough but I feel New Zealand playing two tests before the final will give them an advantage. #WTCFinal https://t.co/llvQM4OocI
— Brad Hogg (@Brad_Hogg) June 8, 2021
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
“एक काळ असा होता की, भारत आणि पाकिस्तान मालिकेला प्रतिष्ठेच्या ऍशेसपेक्षा जास्त पाठिंबा मिळायचा”
इशांत शर्मा होणार WTC Final मधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी
निलंबन झालेल्या ओली रॉबिन्सनचा ‘मोठा’ निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला ब्रेक






