पल्लेकेले, श्रीलंका | भारताचा कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल ५ विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
-विराटनं शतक ठोकलं तर तो जयसूर्याला (२८ शतक) मागे टाकत सर्वाधिक शतक बनवणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
-कोणत्याही देशाविरुद्ध कोहलीने अद्याप २००० धावा केलेल्या नाहीत. त्यासाठी कोहलीला ६२ धावांची गरज आहे.
-४६ धावा केल्यास तो डुप्लेसीसला मागे टाकत २०१७ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.
-८ षटकार ठोकल्यास कोहलीचं षटकारांचं शतक पूर्ण होईल.
-८०० चौकार पूर्ण करण्यासाठी कोहलीला आणखी २४ चौकारांची गरज आहे.
सौजन्य:- www.thodkyaat.com