---Advertisement---

BIG BREAKING । भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला कोरोनाची लागण, कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Virat-Kohli-1. Virat-Kohli-1.
---Advertisement---

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीसाठी टीम इंडियाच्या तयारीला मोठा झटका बसला आहे, कारण भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना विषाणूच्या विळख्यात आले आहेत. एक दिवसापूर्वी, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांद्वारे हे उघड झाले होते की फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होऊ शकला नाही आणि आता लंडनला पोहोचल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “होय, मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतल्यानंतर विराट कोहलीलाही कोविड१९ चा फटका बसला होता, पण आता तो बरा झाला आहे.” मात्र, लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. निदान विराट कोहलीबाबत तरी असे होऊ शकते. तो नुकताच कोरोनामधून बरा झाला आहे. अशा परिस्थितीत, कोरोनामधून बरे झालेल्या खेळाडूंवर जास्त दबाव आणू नये, असा सल्ला बोर्डाने संघ व्यवस्थापनाला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमधून परतल्यानंतर कोहली हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला.

कोरोनाची लागण झाल्यानंतर विराट संघासोबत कसा गेला?
आता प्रश्न उपस्थित होत आहे की, मालदीवमधून परतल्यानंतर कोहली कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर तो खेळाडूंसोबत इंग्लंडला कसा गेला? तर आर अश्विनने कोरोनाची लागण झाल्यानंतर सहकारी खेळाडूंसोबत इंग्लंडला जाण्यास नकार दिला होता आणि तो सध्या बरा होत आहे. बीसीसीआयनेही विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

कोहली लंडनमध्ये मास्कशिवाय फिरताना दिसला
विराट कोहली आता कोरोनामधून बरा झाला आहे. तथापि, यापूर्वी सोशल मीडियावर त्याचे काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये तो मास्कशिवाय लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. यादरम्यान अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले. यादरम्यान कॅप्टन रोहित शर्माही त्याच्यासोबत शॉपिंग करताना दिसला. अशा परिस्थितीत कोहलीचे हे बेजबाबदार वर्तन बाकीच्या खेळाडूंसाठी अडचणीचे ठरू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

रोहित-विराटला ‘ही’ चूक चांगलीच भोवली, बीसीसीआयने फटकारल्याने दोघांच्या अडचणीत वाढ

आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---