भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान टी20 विश्वचषकाआधी ब्रिस्बेन येथे सराव सामना खेळला गेला. मुख्य स्पर्धेआधी आत्मविश्वासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवत ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी पराभूत केले. या सामन्यात अखेरच्या क्षणी भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने क्षेत्ररक्षणात दाखवलेली चपळाई चर्चेचा विषय ठरतेय. त्याने मोक्याच्या क्षणी टिपलेल्या झेलाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.
Unbelievable catch by virat kohlihttps://t.co/Lad9yxiZP9
— Kevin (@imkevin149) October 17, 2022
ऍरॉन फिंचच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघ विजयी लक्षाच्या जवळ जात होता. 19 व्या षटकात विराटने धोकादायक ठरू शकणाऱ्या टीम डेव्हिडला थेट फेक करत धावबाद केले. अखेरच्या षटकात संघाला जिंकण्यासाठी केवळ 11 धावांची गरज होती. त्यातही 4 चेंडूवर 7 धावा असे सोपे समीकरण असताना पॅट कमिन्सने लॉंग ऑनच्या दिशेने षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. चेंडू षटकारापार जाईल असे वाटत असतानाच विराटने केवळ एका हाताने उत्कृष्ट झेल टिपत सामन्याचा नूर पालटला. अनेकांनी सोशल मीडियावर या झेलाला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल सराव सामन्यात टिपला गेल्याचे म्हटले.
या सामन्याचा विचार केला गेला तर, दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. दोन्ही संघांनी विश्वचषकाची तयारी म्हणून या सामन्यात आपले प्रमुख संघ उतरवले. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव व केएल राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 186 धावा उभारल्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार ऍरॉन फिंचने एकाकी झुंज देत 79 धावा केल्या. अखेरच्या षटकात 11 धावांचा बचाव करत मोहम्मद शमीने भारतीय संघाला सहा धावांनी विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली टी20 विश्वचषकानंतर होणार निवृत्त? प्रशिक्षकानींच केला खुलासा!
विराट भाऊंनी मैदानावरच धरला ठेका, संघसहकाऱ्यांसमोर केला ‘असा’ डान्स; तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात’