---Advertisement---

बापरे! ५०० वर्ष जून्या शाळेच्या मैदानावर किंग कोहलीने केला सराव

On: मंगळवार, जून 26, 2018 7:06 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या 3 महिन्यांच्या आयर्लंड- इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंड विरुद्ध 2 टी20 सामने आणि इंग्लंड विरुद्ध 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.

आयर्लंड विरुद्ध टी20 मालिका 27 जूनपासून सुरु होणार आहे. या मालिकेआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडमधील जवळपास 500 वर्ष जून्या शाळेच्या मैदानावर काल 25 जूनला सराव केला.

या शाळेचे नाव मर्चंट टेलर असुन ही शाळा 1561 साली सुरु झाली आहे. विराटच्या या सरावाबद्दल या शाळेच्या ट्विटरवरुन पोस्ट टाकण्यात आली आहे. त्याच्या या सरावाचे फोटोही शेअर करण्यात आले आहे.

तसेच ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘काल विराटला सराव करताना पाहुन आनंद झाला. आमच्या युवा खेळाडूंसाठी तो चांगले उदाहरण आहे.’ विराटने हे ट्विट रिट्विट केले आहे.

विराटबरोबरच भारताच्या अन्य खेळाडूंनीही या मैदानात सराव केला आहे. भारताच्या फलंदाजांना नेटमध्ये या शाळेच्या खेळाडूंनी गोलंदाजी केली.

तसेच या शाळेला श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानेही भेट दिली आहे.

या सरावानंतर आज 26 जूनला भारतीय संघ आयर्लंडला रवाना झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: हार्दिक पंड्याने घेतली आजी-माजी कर्णधारांची हटके मुलाखत

अजिंक्य रहाणेने मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाब्बासकी

अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment